Onion Production : कांदा उत्पादकांचे दुःख जाणून शासनाने मदत करावी

Onion Damage : अस्मानी संकटामुळे सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पावसात कांदा भिजल्याने कांदा काढणीपश्चात तीस ते चाळीस टक्के कांद्याचे नुकसान झाले आहे.
 Onion
OnionAgrowon
Published on
Updated on

Nashik Onion Rate : अस्मानी संकटामुळे सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पावसात कांदा भिजल्याने कांदा काढणीपश्चात तीस ते चाळीस टक्के कांद्याचे नुकसान झाले आहे; तर निम्मा कांदाही गुणवत्तेचा राहिला नाही. कांदा पिकवण्यासाठी जवळपास १५ रुपये प्रति किलो खर्च येत असताना ५ ते ६ रुपये दर मिळत आहे.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकारने दुःख जाणून घेत तत्परतेने मदत करावी, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेने बुधवारी (ता. १७) बागलाण तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

कांदा हे नाशिक जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. सटाणा तालुक्यात उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. एकीकडे वादळी वाऱ्यासह पावसामुळे कांद्याचे तर फळपिकांमध्ये डाळिंब व द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. अनेक ठिकाणी बागा बाधित झाल्या आहेत.

शेतकऱ्यांचे कांदा चाळ शेड व राहत्या घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. पशुधन मृत्युमुखी पडले आहे. तरी शासनाने या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी तहसीलदार प्रशांत सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

 Onion
Onion Subsidy : सांगली जिल्ह्यातील ३९५० शेतकऱ्यांचे कांदा अनुदानासाठी अर्ज

या वेळी सम्राट कोर, भाऊसाहेब पगार, मधुकर पगार, संदीप कापडणीस, नीलेश सावंत, प्रवीण सावंत आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्यावा. न्याय दिला नाही तर अधिकाऱ्यांना घेराव घालावा लागेल, मोठे जनआंदोलन शेतकऱ्यांच्या माध्यमातून उभे करावे लागेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

कांदाप्रश्नी केलेल्या मागण्या

- लाल कांद्याप्रमाणेच उन्हाळी कांद्यास प्रति क्विंटल ५०० रुपयांप्रमाणे अनुदान जाहीर करावे व त्याचा कालावधी जोपर्यंत कांद्याचे दर सुधारत नाहीत तोपर्यंत ठेवावा.

- मध्य प्रदेश शासनाच्या कांदा भावांतर योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कांदा बाजार समितीत भावांतर योजनेनुसार कांदा खरेदी करावी.

- ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी त्वरित सुरू करून ३० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावी.

- रब्बी कांदा अवकाळीमुळे तयार असूनही बाधीत झाल्याने तो साठवणुकीसाठी अयोग्य आहे. हा कांदा विशेष बाब म्हणून शासनाने लाल कांद्याप्रमाणे उन्हाळी बी ग्रेड कांदा ‘नाफेड’च्या माध्यमातून भुकटीसाठी खरेदी करावा, असे मुद्दे मांडण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com