Agricultural Pump Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Pump : कृषिपंपाची थकबाकी ५७६ कोटी रुपयांवर

महावितरण ही सरकारी कंपनी असली तरी ग्राहकांसाठी लागणाऱ्या विजेचे नियोजन करण्यासाठी महावितरणला विविध सरकारी व खासगी स्रोतांकडून वीज विकत घ्यावी लागते.

टीम ॲग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात कृषिपंपधारकांकडे (Agriculture Pump) असलेली वीज थकबाकी (Electricity Arrears) ५७६ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. रब्बीला (Rabi Season) सुरुवात झाली असून, विजेची मागणी वाढली आहे. यासाठी विजेचे नियोजन करता यावे, देखभाल दुरुस्ती व्हावी यादृष्टीने शेतकऱ्यांनी किमान चालू बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

सद्यःस्थितीत रब्बी हंगामाला सुरुवात झाल्याने विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात कृषिपंपाच्या एकूण ६६ हजार ६५८ ग्राहकांकडे ५७६ कोटी ६६ लाख रुपये थकबाकी आहे. रब्बी हंगामात विजेचा अवैध वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वीज यंत्रणेवर भार वाढून रोहित्र निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. रोहित्र निकामी झाल्याने महावितरणचे आर्थिक नुकसान होते. ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित होतो.

चालू वीजबिल भरण्याचे आवाहन

अकोला ग्रामीण विभागातील ४२ हजार ४२७ कृषिपंप ग्राहकांकडे २९२ कोटी ९४ लाख, अकोट विभागातील २४ हजार १३१ कृषिपंपधारकांकडे २८३ कोटी ४१ लाख रुपये थकले आहेत. अकोला शहर विभागात १०० कृषिपंप ग्राहक असून, त्यांच्याकडे वीजबिलाचे ३० लाख थकलेले आहेत. थकबाकीदार शेतकऱ्यांनी किमान चालू वीजबिल भरण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Gram Panchayat : अमरावतीत ५५१ ग्रामपंचायतींवर १७४ प्रशासकांची नियुक्ती

Kanhapur Crop Inspection : कान्हापूर येथे पिकांची पाहणी

Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत

Ahilyanagar Public Health : अहिल्यानगरला असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी

Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT