Sugarcane  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crop : दहा हजार हेक्टर उसाचे पीक धोक्यात

Sugarcane Farming : दूधगंगा नदीवर झालेली महिन्यात तिसऱ्यांदा उपसाबंदी, वेदगंगा व चिकोत्रा नदी आठ दिवसांपासून कोरडी पडली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : दूधगंगा नदीवर झालेली महिन्यात तिसऱ्यांदा उपसाबंदी, वेदगंगा व चिकोत्रा नदी आठ दिवसांपासून कोरडी पडली आहे. कृषी पंपासाठी होणारा विजेचा लपंडाव यामुळे तिन्ही नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो हेक्टर ऊस क्षेत्रापैकी दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस पीक वाळत आहे.

लांबलेला पाऊस, उपसाबंदी, कृषिपंपासाठी वरचेवर होणारा खंडित वीजपुरवठा यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचे फेर पूर्ण होत नाहीत. तसेच लोड शेडिंगच्या नावाखाली कृषिपंपाचा वीजपुरवठा केव्हाही, कितीही वेळ खंडित केला जातो. हा खंडित वीजपुरवठा वाढवून मिळत नाही. त्यामुळे केवळ चार तासच वीज मिळते.

अशातच उपसाबंदीच्या आदेशाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कागल तालुक्यातील वेदगंगा व चिकोत्रा नद्या कोरड्या पडल्याने प्रामुख्याने ऊस पीक धोक्यात आहे. त्याचबरोबर नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे.

वेदगंगा चिकोत्रा तसेच दूधगंगा नदीकाठच्या परिसरात वळीव पावसाने बऱ्याच वेळा हुलकावणी दिल्याने व अपुरा पाणीपुरवठा यामुळे पिके होरपळत आहेत. पाणी देऊन पिकांची केलेली पेरणीही अडचणीत आहे. ऊस पिकाबरोबरच सोयाबीन, भातपीकही धोक्यात आहे.

दुबार पेरणीचे संकट

नद्या कोरड्या पडल्या आहेत, तर विहिरींनीही तळ गाठला आहे. मोठ्या तलावामध्ये मृतसाठा शिल्लक आहे. आठवड्यात पाऊस लागला नाही तर ऊस पिकाचे नुकसान होईलच; त्याचबरोबर भात पिकाची दुबार पेरणी करावी लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pearl Farming : शिंपल्यांच्या शेतीतून दर्जेदार मोती

Satpuda Goat : गावरान सातपुडा शेळ्यांसाठी फैजपूर बाजार

Sericulture Farming: दर्जेदार तुती पाला उपलब्धतेवर भर

Cotton Import Duty : कापूस उत्पादकांना झटका; कापसावरील ११ टक्के आयातशुल्क सरकारने काढले

Dead Livestock Management: मृत जनावरांसाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब

SCROLL FOR NEXT