Team Agrowon
एकरीं 100 टनासाठी जमिनीची पूर्व मशागत चांगली केली. त्यामध्ये दोनदा उभी आडवी नांगरट, रोटावेटरचा वापर केले. सरीतील अंतर 4.5ते 5फुट ठेवले. बियाणे दर्जेदार वापरले.खतांचें सर्व डोसेस मातीआड केले. वेळच्या वेळी कीड रोग,बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण केले.
ऊसाची विरळणी करून एका स्क्वेअर फुटाला 1ऊस ठेवलेला आहे. ऊसाची बांधणी चांगल्या प्रकारे केली.दोनदा पाचट काढले.पाण्याचे नियोजन योग्यरीत्या केले. ऊस लोळण्या आधी प्लॉटच्या चारीबाजूने दाबून(रेलून )घेतले.ऊसामध्ये एकही वाट ठेवली नाही.आता पाणी देण्याशिवाय दुसरं काम राहीलं नाही.
ज्या वेळी एकरीं 100टनाच्या प्लॉटची तोडणी सुरू होते.त्यावेळी अक्षरशः मोळी ठेवायला जागा राहत नाही.दोन मोळया ठेवल्याकी तीसरी मुळी ठेवायला जागा राहत नाही ती उचलून वरती ठेवावी लागते.
विरळणी करून योग्य संख्या नियंत्रण केल्यामुळे तसेच दोनदा पाचट काढलेले असल्यामुळे आत मध्ये हवा खेळती राहते. ऊस आत कसाही पडला तरी ऊसाची मर कमी होते.व जिवंत ऊसाची संख्या जास्त राहते.त्यामुळे ऊस तोडणी करत असताना मरका,जळका,वाळका ऊस अतिशय कमी निघतो.
ऊस पडलेला असल्यामुळे तीन ठिकाणी बेंड आलेला असतो. ऊसाचे तीन-तीनचार-चार कंडके होतात.ऊसाची लांबी वाडे सोडून 18ते 22फुटापर्यंत वाढलेली असते.45कांडी पासून 52कांडी पर्यंत ऊस वाढलेला असतो.प्रत्येक ऊसाला बेंड आलेला असल्यामुळे ऊस तोडल्यानंतर प्रत्येक ऊस ओढून बाहेर काढावा लागतो.
एकरीं 43000 हजार ऊस संख्या ठेवलेली आहे.त्यातील 3000ऊस जरी मरून कमी झाले तरी एकरीं 40000 हजार संख्या राहते.व एक ऊस 2.5किलोचा भरला तरी एकरीं 100टन ऊस निघते.