Sugarcane Production : राज्यात यंदाही उसाच्या उत्पादनात घटीची शक्यता

Fertilizer Management : पावसाळ्याच्या प्रारंभी करण्‍यात येणारे खताचे व्यवस्थापन रखडले आहे. त्यामुळे याचा सरसकट परिणाम उसाच्‍या वाढीवर होत आहे.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : तब्बल पंधरा दिवस पाऊस लांबल्‍याने यंदाही ऊस उत्पादनात घटीची भीती व्यक्‍त केली जात आहे. विशेष करून राज्यातील ऊसपट्ट्यामध्ये मॉन्सूनपूर्व (वळीव) पाऊस न झाल्‍याने उसाच्या वाढीला अडथळे येत आहेत.

बागायती पट्टा असणाऱ्या क्षेत्रालाही यंदा पाणीटंचाईची झळ बसली आहे. अनेक नद्यांतून शेतीला पाणीपुरवठा करण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहे. एकीकडे पावसाची वक्रदृष्टी आणि दुसरीकडे नद्या, विहिरींचेही पाणी कमी झाल्‍याने उसाला पाणी देणे अशक्‍य बनले आहे.

पावसाळ्याच्या प्रारंभी करण्‍यात येणारे खताचे व्यवस्थापन रखडले आहे. त्यामुळे याचा सरसकट परिणाम उसाच्‍या वाढीवर होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर आडसाली लागवडी केल्‍या, त्या लागवडी संकटात आल्‍या आहेत.

गेल्या वर्षी ऊस उत्पादन घटीमुळे सर्वांचे अंदाज चुकले. काही ठिकाणी अतिपावसामुळे उसाची वाढ चांगली झाली नाही. यंदा मात्र कमी पावसामुळे उसाची वाढ रखडल्याचे चित्र आहे. सध्या आडसाली, पूर्वहंगामी, सुरू हंगामांतील उसाची वाढ सरासरी सहा महिन्यांची आहे.

उन्हाळ्‍याच्‍या दिवसांत कडाडणाऱ्या विजा, वादळी पाऊस ऊस पिकाला आधार देतो. कडाडणाऱ्या विजांमुळे हवेतला नायट्रोजन जमिनीला मिळत असतो.

Sugarcane
Sugarcane FRP: दोन टप्यातील एफआरपीचा कायदा मागे घेणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

जोरदार पावसामुळे जमिनीचा ओलसरपणा टिकतो. यामुळे पाटपाण्याबरोबर ठिबकने पाणी देण्‍याचा ताणही कमी होतो. ऊसपट्ट्यात विशेष करून पश्‍चिम- दक्षिण महाराष्ट्रारात सिंचनाच्या सोयी असल्‍याने ऊसवाढीवर सहसा परिणाम होत नाही.

यंदा मात्र या पट्ट्यातही एप्रिल, मेमध्ये ४० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहिले. उष्णतेत तर वाढ झालीच, याच बरोबर भूगर्भातील पाण्याचा साठाही कमी झाला.

मिळालेल्‍या विद्युतपुरवठ्यांमध्ये पाण्याचा फेरा होत नसल्‍याने यंदा बहुतांशी शेतकऱ्यांना उसाला पुरेसा पाणीपुरवठा करणे अशक्‍य बनले. वळीव झाल्‍यास काही दिवस तरी दिलासा मिळेल, अशी शक्‍यता असताना तोही पाऊस झाला नाही. आता ढगाळ हवामान आणि उष्णता असल्‍याने भरीस भर म्‍हणून रस शोषणाऱ्या कीटकांचीही प्रादुर्भावही होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

लांबलेला पाऊस, उष्णता व ढगाळ हवामान या बाबी ऊसवाढीला अडथळे आणत आहेत. सर्व हंगामांत लागवड केलेल्‍या उसाला सध्या पाण्‍याची मोठी गरज आहे. ढगाळ हवामानामुळे किडी वाढत आहेत. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार औषधांची फवारणी करावी.
डॉ. अशोक पिसाळ, कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com