Weather Update
Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : तापमानातील चढ-उतार कायम

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्यात दोन दिवसांपूर्वी असलेले ढगाळ वातावरण (Cloudy Weather) काहीसे निवळल्यानंतर राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील (Temperature) चढ-उतार सुरू आहेत. राज्यात पहाटे गारठा (Clod Weather) आणि दुपारी उन्हाचा (Heat) चटका अनुभवायला मिळत आहे. गुरूवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे १२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापासून मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या काही भागात ढगाळ हवामान होते. गुरूवारी (ता. १०) राज्यात निरभ्र आकाशासह उन्हाचा चटका काहीसा वाढल्याचे दिसून आले.

राज्यात अद्याप गुलाबी थंडीची प्रतिक्षा आहे. पहाटेच्या वेळी गारठा, धुके आणि दव पडत आहे. राज्याचे किमान तापमान १२ ते २३ अंशांच्या दरम्यान, तर कमाल तापमान ३१ ते ३५ अंशांच्या आसपास आहे. आज (ता. ११) राज्यात कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढतेय

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बुधवारी (ता. ९) कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती झाले आहे. आजपर्यंत (ता. ११) ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, शनिवारपर्यंत (ता. १२) तामीळनाडू आणि पदुच्चेरीच्या किनारपट्टीकडे येण्याचे आणि त्यानंतर अरबी समुद्राकडे जाण्याचे संकेत आहेत.

बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.२ (१२.८), नगर ३३.० (-), जळगाव ३३.६ (१५.८), धुळे ३३.० (१२.०), कोल्हापूर ३१.६ (१७.०), महाबळेश्वर २६.९(१३.४), नाशिक ३०.९ (१३.८), निफाड ३०.० (१२.५), सांगली ३१.८(१५.८), सातारा ३१.५(१४.७), सोलापूर ३३.८ (१७.०), सांताक्रूझ ३४.४(२२.४), डहाणू ३३.० (२१.५), रत्नागिरी ३५.२ (२०.९)

, औरंगाबाद ३१.२ (१३.४), नांदेड ३३.२ (१६.८), उस्मानाबाद - (१५.०), परभणी ३१.३ (१५.०), अकोला ३३.४ (१७.१), अमरावती ३२.४ (१५.३), बुलढाणा ३१.२ (१६.५), ब्रह्मपूरी ३३.२ (१६.९), चंद्रपूर ३०.६ (१७.८), गडचिरोली ३१.०(१५.६), गोंदिया ३०.४(१५.५), नागपूर ३१.७ (१६.२), वर्धा ३१.५(१६.८), वाशीम ३४.० (-), यवतमाळ ३१.५ (१४.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

SCROLL FOR NEXT