Barshi Agricultural Festival : बार्शीत आजपासून भगवंत कृषी महोत्सव

पाच दिवस आयोजन; महसूलमंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन
Agricultural Festival
Agricultural FestivalAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती (Barshi Agricultural Produce Market Committee) च्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या आणि बाजार समितीच्या अमृत महोत्सवानिमित्त आजपासून १३ नोव्हेंबरपर्यंत पाचदिवसीय राज्यस्तरीय भगवंत कृषी महोत्सवाचे ( Agricultural Festival) आयोजन करण्यात आले आहे. आज (ता.९) सायंकाळी सहा वाजता या महोत्सवाचे उद्‍घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होईल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांनी दिली.


Agricultural Festival
Diwali Festival : अंतरीचा दिवा पेटवुया...

सभापती राऊत म्हणाले, ‘‘मार्केट यार्डच्या मैदानावर भरवण्यात येणाऱ्या या महोत्सवाच्या उद्‍घाटनावेळी आमदार राजेंद्र राऊत उपस्थित राहतील. शेतकरी केंद्रबिंदू ठेवून या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याचे ठरविले. त्यानुसार या महोत्सवात वैविध्यपूर्ण अवजारे स्पर्धा, वैशिष्ट्यपूर्ण पशुधन प्रदर्शन, पीक स्पर्धा व पारितोषिके, महिला बचत गट मेळावा, डॉग शो, कृषी प्रात्यक्षिके, शेती अवजारांचे स्टॅाल्स असतील.’’ ‘‘या महोत्सवात सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. या निमित्ताने लहरी हवामान, फळछाटणीनंतर द्राक्षवेलीचे व्यवस्थापन, आदर्श गोठा व्यवस्थापन, एकर शंभर टन ऊसउत्पादनावरील विविध चर्चसत्रांसह महिला मेळाव्याचेही आयोजन केले आहे,’’ असेही ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ संचालक रावसाहेब मनगिरे, सचिव तुकाराम जगदाळे व अन्य संचालक उपस्थित होते.

Agricultural Festival
Agriculture Drone : ड्रोनसाठी मल्टिस्पेक्ट्रल, हायपरस्पेक्ट्रल सेन्सर

‘दोन टनांचा रेडा, साडेतीन फुटांचा कोंबडा’
‘‘डेअरी तंत्रज्ञान व उत्पादने, कुक्कुटपालन, हॉर्टिकल्चर, सिंचन यंत्रणा, पशुधन विकास, सौरऊर्जा, जल व्यवस्थापन, शेतीमाल साठवणूक यंत्रणा, अपारंपरिक ऊर्जा, संरक्षित शेती, शेतविमा व अर्थसाहाय्य, शैक्षणिक संस्था, सहकार क्षेत्र, फार्म टेक्नॉलॉजी, उती संवर्धक तंत्रज्ञान, जैविक खते, फार्म मशिनरी याच्या आस्थापना व कंपन्यांचा यात सहभाग असेल. त्याशिवाय पशू प्रदर्शनात दोन टनांचा रेडा, साडेतीन फुटांचा कोंबडा हे वेगळे आकर्षणही असेल,’’ असेही राऊत म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com