Sandipan Bhumare Agrowon
ताज्या बातम्या

Sandipan Bhumare : संत साहित्यामुळे सुसंस्कारीत समाज घडविण्याचे कार्य ः भुमरे

पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत संत साहित्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. संत साहित्यामुळे सुसंस्कारीत समाज घडविण्याचे कार्य होत आहे,’’ असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केले.

Team Agrowon

Marathi Sant Sahitya Sammelan परभणी ः ‘‘पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत संत साहित्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. संत साहित्यामुळे सुसंस्कारीत समाज घडविण्याचे कार्य होत आहे,’’ असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी केले.

परभणी येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित ११ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी (ता.१२) भुमरे यांच्या हस्ते झाले.

संमेलनाध्यक्ष हभप डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकूरबुवा, पूर्व संमेलनाध्यक्ष बाळासाहेब महाराज देहूकर, आमदार भरत गोगावले, स्वागताध्यक्ष रत्नाकर गुट्टे, आमदार सुरेश वरपूडकर, डॉ. राहुल पाटील, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, राज्य शासनाचे अतिरिक्त सचिव प्रदीप व्यास, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, माजी खासदार तुकाराम रेंगे, सुरेश जाधव, माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हाधिकारी आंचल गोयल आदी उपस्थित होते.

भुमरे म्हणाले, ‘‘समृद्धी महामार्गामुळे राज्यातील तीर्थक्षेत्र जोडली गेली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या एसटी बसच्या मोफत प्रवास योजनेचा सर्वाधिक लाभ वारकऱ्यांना होत आहे. संत साहित्य संमेलनाच्या अनुदासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवू.

राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये, त्यादृष्टीने राज्य सरकार योजना राबवीत आहे. शेतकऱ्यांना सर्वेतेपरी मदत केली जात आहे. रोजगार हमी योजना खात्याअंतर्गत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून या खात्याला नावारूपाला आणले आहे.’’

डॉ. गरुड यांनी विश्व शांतीसाठी संत साहित्याचे महत्त्व असल्याचे सांगितले. वारकरी विठ्ठल पुरस्काराचे वितरण मंत्री भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT