
Marathi Sant Sahitya Sammelan परभणी ः वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्रतर्फे ११ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन परभणी येथे रविवार (ता. १२) ते मंगळवार (ता.१४) या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
संत तुकाराम महाविद्यालय मैदानावर या संमेलनाचे उद्घाटन उद्या (ता. १२) सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल. मंगळवारी (ता.१४) राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत समारोप होईल.
या संमेलनाचे अध्यक्ष हभप तुकाराम महाराज गरुड ठाकूरबुवा दैठणकर आहेत. स्वागताध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे हे आहेत, अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, ‘‘वारकरी साहित्य हे अत्यंत समृद्ध साहित्य आहे. या संमेलनामध्ये दिंडी सोहळा, सामुदायिक हरिपाठ, कीर्तन, अभंगवाणी यासह विविध विषयांवर परिसंवाद होतील.
उद्घाटन सत्रानंतर दुपारी २ वाजता ‘२१ व्या शतकात संत साहित्याची उपयुक्तता’ या विषयावर, दुपारी ४ वाजता ‘कीर्तनाच्या मानमर्यादा’ यावर, सोमवारी (ता.१३) सकाळी १० वाजता ‘संतभूमी मराठवाडा’ व ‘शेतकरी आत्महत्या’ या विषयावर, दुपारी १२ वाजता स्त्री संतांचा वारकरी संप्रदायातील प्रभाव, दुपारी २ वाजता वारकरी संतांचे लोकोत्तर कार्य, दुपारी ४ वाजता संतांच्या भूमिकेतून व्यसनमुक्ती’ व ‘जादूटोणा विरोधी प्रचार’ या विषयावर परिसंवाद होतील.
मंगळवारी (ता. १४) सकाळी ९ वाजता हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. सकाळी साडेदहा वाजता खुले अधिवेशन व ठराव घेण्यात येतील. त्यानंतर संमेलनाचा समारोप होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.