Mhaisal Water Scheme
Mhaisal Water Scheme  Agrowon
ताज्या बातम्या

Mhaisal Water Scheme : विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा

टीम ॲग्रोवन

सांगली : जत तालुक्यातील गावांसाठी महत्त्वाची असणारी विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना (Mhaisal Water Scheme) पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रय़त्न करा. तसेच उपसा सिंचन योजना, (Irrigation Scheme) गावागावातील पाणीपुरवठा योजना (Water Supply Shceme) पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने समन्वय साधून कार्यवाही करा. या कामासाठी लागणाऱ्या निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबई येथे सह्याद्री राज्य अतिथीगृहात शुक्रवारी (ता. २) जत तालुक्यातील या गावांच्या विविध प्रश्नांविषयी बैठक घेण्यात आली. या वेळी कामगारमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर, खासदार संजय पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार प्रकाश शेंडगे, प्रधान सचिव विकास खारगे, ऊर्जा विभाग प्रधान सचिव अभा शुक्ला, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव संजीव जयस्वाल, सांगलीचे जिल्हाधिकारी एम. राजा दयानिधी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की या भागातील गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना आणि गावा-गावांतील पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. विस्तारित उपसा सिंचन योजनेसाठीची सुधारित प्रशासकीय मान्यता, ते प्रत्यक्ष काम सुरू होणे यासाठी सर्वच पातळ्यांवर कार्यवाहीला गती द्या.

एकीकडे तांत्रिक बाबी, आराखडे तसे अनुषंगिक बाबी पूर्ण करण्यावर भर द्यावा. विस्तारित योजनेतून पाणी मिळवण्याचा टप्पा तसेच वितरण जाळे यांचे काम यांचा ताळमेळ साधा. पाण्यापासून वंचित या गावांना दिलासा देण्यासाठी आणि या गावांसाठीच्या पाणी योजनांसाठी उद्भव स्रोत असणाऱ्या तलावांमध्ये वेळेत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सर्व बाबींसाठी कालबद्ध पद्धतीने आणि नेमके नियोजन करा.

द्राक्ष, डाळिंब बागांच्या सिंचनाचा मुद्दा महत्त्वाचा

जत, आटपाडी, कवठे महांकाळ आणि तासगाव या तालुक्यात द्राक्ष आणि डाळिंब बागांच्या सिंचनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. या बागांना दिवसा पाणी देता यावे यासाठी भारनियमनाच्या वेळांमध्ये सवलत देण्यासाठी एमईआरसी आणि विविध यंत्रणांनी विशेष बाबीसंबंधी सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी प्रस्ताव तयार करावा

आरोग्य सुविधांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण आणि तेथील पदभरती, शिक्षकांची पदभरती, शाळांसाठी आवश्यक निधीसाठीची तरतूद याबाबत विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी प्रस्ताव तयार करावेत. या भागातील रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत संबधित विभागाने समन्वय ठेवून तातडीने कार्यवाही करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT