Maisal Water Scheme : जत-म्हैसाळ विस्तारित योजना अहवाल पाठवण्याची सूचना

जतच्या वंचित ६५ गावांसाठी राबवण्यात येणारी विस्तारित म्हैसाळ पाणी योजना पूर्ण होईपर्यंत मायथळ कालव्यातून व्हसपेठ तलावात पाणी टाकणे व तेथून नैसर्गिक प्रवाहातून पूर्वेचे आठ तलाव भरण्याच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली.
Maisal Water Scheme
Maisal Water SchemeAgrowon

जत, जि. सांगली : जतच्या वंचित ६५ गावांसाठी राबवण्यात येणारी विस्तारित म्हैसाळ पाणी योजना (Maisal Water Scheme) पूर्ण होईपर्यंत मायथळ कालव्यातून (Maythal Canal) व्हसपेठ तलावात पाणी टाकणे व तेथून नैसर्गिक प्रवाहातून पूर्वेचे आठ तलाव भरण्याच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सकारात्मकता दर्शवली.

Maisal Water Scheme
Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांना अनुदानासाठी दावरवाडी फाट्यावर ‘रास्ता रोको’

शिंदे सेनेच्या येथील काही पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ३०) मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी या योजनेचा अहवाल तातडीने पाठवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पाच दिवसांपासून जतची इत्थंभूत माहिती संकलित केली जात आहे. शिवाय, म्हैसाळ विस्तारित योजनेच्या कामाला जानेवारीत सुरुवात करण्याचे निर्देशही त्यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत.

पाणी देता का कर्नाटकात पाठवता, असा इशारा देत कृष्णेचा कलश घेऊन मंगळवारी (ता. २९) सांगलीतून संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक तुकाराम महाराज मुंबईत दाखल झाले. बुधवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापासून काही अंतरावर त्यांना पोलिसांनी रोखून ठेवले. मात्र, जिल्ह्यातील शिंदे सेनेचे प्रमुख आनंदराव पवार, जतचे संपर्क प्रमुख योगेश जानकर, तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, तम्मा कुलाळ, युवा नेते सचिन मदने, दिनराज वाघमारे यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जतचा कुठलाही प्रश्न प्रलंबित ठेवणार नाही. आपण सर्वांनी जत तालुक्यातील जनतेला माझ्या वतीने आश्वासित करावे, राज्य सरकार जतला लागेल ती मदत करणार आहे. ६५ गावांची विस्तारित योजना जानेवारीत सुरू करू. शिवाय जतमधील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही. पुढच्या आठवड्यात जतबाबत आणखी चांगले आणि सकारात्मक निर्णय घेण्यात येतील. तालुक्यातील सर्वच विभागाची माहिती माझ्याकडे येत आहे. विस्तारितचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com