‘म्हैसाळ’च्या बंदिस्त पाइपलाइनसाठी २२० कोटी

जतच्या दुष्काळ मुक्तीसाठी वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील बंदिस्त पाइपलाइनच्या कामासाठी २२० कोटी ८१ लाखांची निविदा प्रसिद्ध झाली आहे.
220 crore for the closed pipeline of 'Mahisal'
220 crore for the closed pipeline of 'Mahisal'
Published on
Updated on

जत, जि. सांगली ः जतच्या दुष्काळ मुक्तीसाठी वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील बंदिस्त पाइपलाइनच्या कामासाठी २२० कोटी ८१ लाखांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. कामासाठी वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यातून ६० ते ७० गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे, अशी माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.  ते म्हणाले, ‘‘तालुक्यात म्हैसाळ योजना कालव्याच्या बंदिस्त पाइपलाइनचे काम वर्षापासून प्रलंबित होते. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या पाठपुराव्याने ती चिंता दूर झाली आहे. ६० ते ७० गावांतील ५२ हजार २५ हेक्टर क्षेत्रावरील बंदिस्त पाइपलाइनचे रखडलेले काम पूर्ण होऊन शेतीसाठी लागणारी योजना मार्गी लागणार आहे.’’  श्री. सावंत म्हणाले, ‘‘जत तालुक्यातील जनतेने गेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्यावर विश्‍वास ठेवून कामाची संधी दिली. त्याच विश्‍वासापोटी जतच्या दुष्काळ मुक्तीसाठी आपली वाटचाल आहे. येत्या काळात जत तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत म्हैसाळ योजनेचे पाणी नेणे, ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडू. सध्या तालुक्यात टीकात्मक राजकारणाला ऊत आला आहे. जतच्या विकासासाठी कोणी प्रयत्न केला अन् कोणी सत्तेसाठी विकासाला खो घातला याची मोजदाद जनता करेलच. मात्र येत्या काळात जत समृद्ध व संपन्न करणे हेच उद्दिष्ट आहे. जतसाठी भरघोस निधी उपलब्ध करून विकासाचा बॅकलॉग भरून काढू.’’ जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय शिंदे, माजी सभापती बाबासाहेब कोडग, ज्येष्ठ नेते मारुती पवार, समाधान शिंदे, बंडू शेख उपस्थित होते. 

बंदिस्त पाइपलाइनसाठी मंजूर निधी  जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून जत कालवा १ ते २५ कि.मी.साठी - २१ कोटी १७ लाख, जत कालवा २६ ते ५२ कि.मी.साठी - ३२ कोटी ३६ लाख, जत कालवा ५३ ते ८१ कि.मी.साठी- १६ कोटी ७९ लाख, जत शाखा कालवा कामासाठी - ३६ कोटी ८५ लाख, देवनाळ १ व २ साठी- ३० कोटी २७ लाख, देवनाळ विस्तारितसाठी -२२ कोटी ३१ लाख, अंतराळ, सिंगनहळ्ळी, बनाळी व शेगाव साठी - २० कोटी ७४ लाख बिळूर १ व २ साठी - २१ कोटी १३ लाख, मिरवाडसाठी -१९ कोटी १५ लाख असा एकूण २२० कोटी ८१ लाख इतका निधी मंजूर आहे.  

   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com