Amaravati News : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारे ट्विट व आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या शहरातील सौरभ पिंपळकरविरुद्ध कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. शहरातील पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांकडे, तर ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
या संदर्भात मुंबईमध्ये तक्रार नोंदविल्यानंतर स्थानिक पातळीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ९) पोलिस आयुक्तालयावर धडक दिली.
शिष्टमंडळाने नवीनचंद्र रेड्डी यांना निवेदन सादर केले. त्यात शरद पवार यांना धमकी देण्यासह सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरुन काही आक्षेपार्ह मॅसेज व्हायरल करणाऱ्या सौरभ पिंपळकर विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी शहराध्यक्ष प्रशांत डवरे, प्रमोद महल्ले, बंडू निंभोरकर, अविनाश मार्डीकर, अॅड. किशोर शेळके, किशोर भुयार, नीलेश शर्मा, अमोल देशमुख, ऋतुराज राऊत, राजेंद्र वानखडे, संजय मळनकर, प्रा. राजा मोरे, आकाश हिवसे यांच्यासह इतरही पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखाताई ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांना निवेदन देत संबंधितांविरोधात कारवाईची मागणी केली.
या वेळी माजी जिप उपाध्यक्ष संतोष महात्मे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष निखिल ठाकरे, सुषमा बर्वे, आकाश हिवसे, चिन्मय बर्वे, जयेश सोनोने, अभी लोयटे, अभिजित वैद्य, अक्षय चौधरी, अंकित दहीकर, संचित धोंडे, ऋषिकेश नवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामीण पदाधिकाऱ्यांची गृहमंत्र्यांकडे तक्रार
शरद पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे, त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांकडे केली.
त्याकरिता महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजय भाकरे यांना निवेदन सादर केले. या वेळी प्रदेश सचिव भास्करराव ठाकरे, प्रकाश नाना बोंडे, अनिल ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.