Sharad Pawar : एक घर, एक झाड उपक्रमाला पवारांची उपस्थिती

Team Agrowon

जागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 'एक घर, एक झाड' या उपक्रमाचे आयोजन व त्याअंतर्गत केशर आंब्याच्या कलमांचे वितरण पुणे येथील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष कार्यालयात करण्यात आले.

Sharad Pawar | Agrowon

वसुंधरा ट्री फाउंडेशन

वसुंधरा ट्री फाउंडेशन, मुंबई या संस्थेचे प्रणेते कृषिभूषण गोविंदराव पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अत्यंत स्तुत्य अशा या उपक्रमास उपस्थित खा. शरद पवारांनी हजेरी लावली.

Sharad Pawar | Agrowon

पर्यावरण संवर्धन

पर्यावरण संवर्धनासाठी संघटितपणे पुढाकार घेऊन अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचा निर्धार यानिमित्ताने करूया, असे आवाहन पवारांनी उपस्थितांना केले.

Sharad Pawar | Agrowon

समतोल राखणे

पर्यावरणाचा समतोल राखणे व पर्यावरण हानी रोखणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

Sharad Pawar | Agrowon

जैवविविधतेच्या संरक्षण

पर्यावरण व पृथ्वीवरील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी पुढाकार घेऊन पर्यावरणस्नेही शाश्वत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा निश्चय करूया, असा संदेश पवारांनी समाजमाध्यमातून दिला.

Sharad Pawar | Agrowon

कार्यकर्त्यांशी संवाद

पवारांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच विविध विषयांवर चर्चा केली.

Sharad Pawar | Agrowon
Apple | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा