Electricity  Agrowon
ताज्या बातम्या

Electricity Tower : वीज मनोऱ्यामुळे बाधित शेतकऱ्यांचे होणार पंचनामे

Agriculture Electricity : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मनोऱ्याखालील क्षेत्रासाठी रेडीरेकनर दराच्या दुप्पट, तर उर्वरित बाधित क्षेत्रासाठी रेडीरेकनरच्या ३० टक्के देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

Team Agrowon

Pune News : पाबळ (ता. शिरूर) येथील चौधरी वस्तीतील महापारेषणच्या मनोऱ्यामुळे बाधित झालेल्या संपूर्ण क्षेत्राचे, तेथील पिकांचे आणि झाडे-विहिरी आदींचे पंचनामे करण्याचा निर्णय प्रांताधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. शिरूर येथे झालेल्या बुधवारच्या (ता. १२) बैठकीत मनोऱ्याच्या लाइनचे काम सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात झाला.

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मनोऱ्याखालील क्षेत्रासाठी रेडीरेकनर दराच्या दुप्पट, तर उर्वरित बाधित क्षेत्रासाठी रेडीरेकनरच्या ३० टक्के देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. याला शेतकऱ्यांच्या वतीने भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी, तर महापारेषणचे अधीक्षक अभियंता प्रकाश कुरसंगे यांनी दुजोरा दिला.

शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई दिली गेली नसल्याने पाबळ येथील चौधरीवस्तीत सुरू असलेल्या उच्चदाबाच्या मनोऱ्यावर वाहिन्या टाकण्याचे काम बंद पाडले होते. या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी केले. शेतकरी-महसूल व महापारेशनची महत्त्वाची बैठक नुकतीच प्रांताधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांच्या उपस्थितीत पार पडली.

या वेळी सदर प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या गेल्या नाहीत, नुकसान भरपाईबाबत महापारेषण बोलत नाही, पोलिस प्रशासनाचा गैरवापर केला जातो, नुकसान भरपाई नेमक्या काय दराने देणार याची माहिती दिली जात नाही, रस्त्यांच्या दरांप्रमाणे पाच पट नुकसान भरपाई दिली जावी आदी मुद्द्यांची चर्चा बैठकीत झाली.

दरम्यान, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत बैठक घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्याची माहिती पाचंगे व बाधित शेतकरी शेतकरी राहुल चौधरी, कल्पेश चौधरी, किशोर डहाळे यांनी दिली.

बैठकीसाठी वरील मान्यवरांसह सरपंच सचिन वाबळे, शिरूर शिवसेना तालुकाध्यक्षा अ‍ॅड. रेश्मा चौधरी, माजी सरपंच सोपान जाधव, थिटेवाडी पाणी आंदोलनाचे प्रमुख परमेश्‍वर चौधरी, बाधित शेतकरी राहुल चौधरी, संजय चौधरी, राजाराम शिवले, संदीप चौधरी, कल्पेश चौधरी, अक्षय जाधव, संपत चौधरी, संजय जाधव, पांडुरंग जाधव, सुखदेव जाधव, किशोर डहाळे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT