Tomato Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Crop Damage : नुकसानग्रस्त टोमॅटो पिकांचा पंचनामा करून मदत द्यावी

दोन एकरात लागवड केलेल्या टोमॅटो पिकापासून अतोनात नुकसान झाल्याने शासनाने मदत द्यावी, अशी मागणी देऊळगाव मही येथील शेतकऱ्याने केली.

Team Agrowon

Buldana News : दोन एकरात लागवड केलेल्या टोमॅटो पिकापासून अतोनात नुकसान झाल्याने शासनाने मदत द्यावी, अशी मागणी देऊळगाव मही येथील शेतकऱ्याने केली. याबाबत तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शेताचा पंचनामा करण्याबाबतही त्यांनी विनंती केली आहे.

शेतकरी मधुकर उत्तमराव शिंगणे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी दोन एकरात टोमॅटोची लागवड केली होती. बाजारात टोमॅटोला मागणी नसल्याने अतोनात नुकसान झाले आहे. पिकासाठी आतापर्यंत साधारणपणे दोन लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

मागील महिन्यात कोबीचे दोन एकरात लागवड केलेले पीकही दर न मिळाल्याने हातातून गेले. तेव्हा या पिकात शेळ्या सोडल्या. तेव्हा कोबी पिकासाठी एक लाख ९० हजारांचा खर्च झाला होता. आधी कोबी व नंतर आता टोमॅटो पिकामुळे अतोनात नुकसान झाले आहे.

सध्या शेतात टोमॅटोचे पीक उभे असून झाडांवर मोठ्या प्रमाणात फळे लागलेली आहेत. बाजारात भाव नसल्याने टोमॅटो तोडणीचाही खर्च निघत नाही. त्यामुळे काढणीअभावी सर्व फळे झाडावर पिकली आहेत.

अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा करावा, अशी मागणी शिंगणे यांनी केली. या संदर्भात सिंदखेडराजा मतदार संघाच्या आजी, माजी आमदारांना माहिती दिली आहे. पिकांचे किती नुकसान झाले, याचा पंचनामा करून घेण्यास त्यांनी संबंधितांना सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Scheme GR: मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजनेचा विस्तार, मुरघास संयंत्राचा शेतकरी समूह गटांना मिळणार लाभ

Multi Cropping Farming: बहूपीक पद्धतीतून बसवले आर्थिक स्थिरतेचे मॉडेल

Crop Insurance Compensation Issues: नुकसान जास्त होऊनही विमा भरपाई तुटपुंजी

Indian Economy Growth: जागतिक अनिश्‍चिततेत भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी

Middle East War: आखाती देशातील युद्ध

SCROLL FOR NEXT