Team Agrowon
टोमॅटोचा दर कोसळल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी हतबल झाला.
दोन रुपये प्रतिकिलोने भाव मिळत असल्याने टोमॅटो रस्त्यांवर व बांधावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. .
लाखो रुपये खर्च करून टोमॅटो लागवड केली असताना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीठीामुळे उदभवलेल्या संकटातून टोमॅटो पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी मेहनत घेतली.
त्यात आता उन्हाचा तडाका वाढ्यामुळे टोमॅटो लाल होऊ लागल्याने बाजारात आवक वाढली आहे.
उत्पादन खर्च तर सोडाच पण टोमॅटो तोडणीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो शेतातच वाढत्या तापमानामुळे खराब होऊ लागला आहे.
दराअभावी शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.
कांद्यांचा भाव पडल्यानंतर आता टोमॅटोचा दरही पडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.