Crop protection Agrowon
ताज्या बातम्या

Paddy crop : रानटी प्राण्यांपासून भात पिके वाचविण्यासाठी साड्यांचा आधार

Crop protection management : भोर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील हिरडस मावळातील शेतकरी भात पिकांचे रानटी जनावरांपासून रक्षण व्हावे यासाठी जुन्या साड्या, रंगीत कापडांचा वापर करून कुंपण तयार करीत असल्याचे चित्र सध्या सगळीकडे दिसून येत आ

Team Agrowon

Pune News : भोर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील हिरडस मावळातील शेतकरी भात पिकांचे रानटी जनावरांपासून रक्षण व्हावे यासाठी जुन्या साड्या, रंगीत कापडांचा वापर करून कुंपण तयार करीत असल्याचे चित्र सध्या सगळीकडे दिसून येत आहे.

भोर तालुक्यातील हिरडस मावळ भाग हा डोंगराळ आणि दाट झाडीचा असल्याने या भागात रानटी जनावरांचा वावर जास्त आहे. यात प्रामुख्याने रानडुक्कर, सांबर, ससे आणि मोर यांचा समावेश जास्त आहे. या प्राण्यांपासून भात, नाचणी व वरई ही पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना कापडी कुंपणांबरोबरच वेगवेगळ्या युक्त्या कराव्या लागत आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच अडचणींचा सामना करत आहे. त्यात आता रानटी प्राण्यांच्या त्रासाने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

रानटी प्राण्यांच्या त्रासातून मुक्तता होण्यासाठी कायम स्वरूपी कुंपणासाठी शासनाने आर्थिक साह्य करावे तसेच रानटी प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वन विभागाकडून अल्प मिळत असल्याने ती वाढवून देण्यात यावी अशी मागणी हिर्डोशी येथील शेतकरी धोंडिबा मालुसरे व संतोष धामुनसे यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Notification : शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना, उद्यापासून नुकसानीचे पंचनामे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले स्पष्ट

Oat Fodder Crop: रब्बी हंगामात ओट पौष्टिक चाऱ्याचा चांगला पर्याय; अडिच महिन्यात पहिली कापणी!

Sugarcane Guarantee Price: हमीभाव मिळेपर्यंत कोयता लावू देणार नाही: रयत क्रांती शेतकरी संघटना

Spray Drying Technology: ‘स्प्रे ड्रायिंग’द्वारे पावडर निर्मिती तंत्र

Agriculture Visit: केंद्रीय कृषी सचिव चंद्रा यांच्यासह अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पुणे दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT