Kharif Seed Supply  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Seed Supply : खरिपासाठी ४५३९ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

Seed Supply : कृषी विभागाकडून बियाणे पुरवठा वेळेत करण्यावर भर

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Kharif Season 2023 : पुणे ः खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून (Agriculture Department) बियाण्यांचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. यंदा मागणी केलेल्या ३३ हजार ३६५ क्विंटल बियाण्यांपैकी ४ हजार ३३९ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे.

गावपातळीवर कृषी सेवा केंद्राकडून हे बियाणे (Seeds) शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहचण्यासाठी वेगाने पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी दोन लाख ७ हजार २५० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते, बियाण्यांची अडचण येऊ नये, म्हणून कृषी विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी खरिपासाठी २९ हजार ५३० क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती. यंदा दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी कृषी विभागाने मागणीमध्ये ३ हजार ८३५ क्विंटलने वाढ करून, ३३ हजार ३६५ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे.

यामध्ये खासगी कंपन्यांकडून २५ हजार ८६५ क्विंटल, महाबीज व राष्ट्रीय बीज निगम विभागाकडून ७ हजार ५०० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा अपेक्षित आहे.

खरीप हंगामासाठी मागणी केलेल्या बियाण्यांमध्ये संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सुधारित बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, वाटाणा, ताग आदी पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात भाताची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कृषी विभागाने भातासाठी १४ हजार ५०० क्विंटल, तर सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याच्या दृष्टीने ९ हजार ५८१ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.

त्यापैकी भात ४ हजार ३३५ क्विंटल, बाजरी ५० क्विंटल, मका १०० क्विंटल, सोयाबीन ५४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.


पीकनिहाय बियाण्यांची मागणी ः (क्विंटलमध्ये)
वाण --- बियाणे
भात --- १४,५००
संकरित बाजरी --- २३३७
मका --- २७३०
तूर --- १७८
मूग --- ३२६
उडीद --- ११३
सोयाबीन --- ९५८१
इतर पिके --- ३६००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT