Sunflower Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Sunflower Sowing : कोल्हापुरात १२ हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी

गेली चार वर्षे सूर्यफूल बियाणे बोगस आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने आणि शेतकऱ्यांनी सूर्यफूल पीक घेण्याकडे पाठ फिरवली होती.

टीम ॲग्रोवन

कुडित्रे, जि कोल्हापूर : जिल्ह्यात शेतकरी सूर्यफूल पिकाकडे (Sunflower Crop) वळत असल्याचे चित्र आहे. खाद्यतेलाचे दर (Edible Oil Rate) वाढल्यानेही यंदा शेतकऱ्यांचा सूर्यफुलाकडे कल (Sunflower Sowing) वाढला आहे. जिल्ह्यात सूर्यफुलाची बारा हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून, १५७ हेक्टर पेरणीचा अंदाज कृषी खात्याने वर्तवला आहे.

जिल्ह्यात गेली चार वर्षे सूर्यफूल बियाणे बोगस आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने आणि शेतकऱ्यांनी सूर्यफूल पीक घेण्याकडे पाठ फिरवली होती. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी इतर राज्यातून बियाणे आणून सूर्यफूल पिके घेतले होते. सूर्यफूल पीक घेण्यासाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पेरणी हंगाम आहे.

आता ऊस तोडणी हंगाम जोमात सुरू आहे, तसेच खाद्यतेलाचे दरीही वाढले आहेत, यामुळे खोडवा पिकात शेतकरी सूर्यफुलाचे पीक घेण्याकडे पुन्हा वळला आहे. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार यंदा १४ क्विंटल सूर्यफूल पिकाचे बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे.

पेरणीला सुरुवात

जिल्ह्यात करवीर, पन्हाळा, शाहूवाडी व बहुतांश सर्व तालुक्यात सूर्यफूल पेरणीला सुरुवात झाली आहे. १२ हेक्टरवर सूर्यफूल पिकाची पेरणी झाली आहे.

शेतकऱ्यांची बियाणाची मागणी असून सर्वत्र बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी लक्ष वेधून सूर्यफूल बियाणे व्यवस्थितपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price: दिवाळीत शेतकऱ्यांना मोठी भेट, हरियाणा सरकारने जाहीर केला देशातील सर्वाधिक ऊस दर

Soybean MSP: हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रियेला विलंब 

Indian Economy: भारतीय बाजारपेठेच्या शक्तीची झलक

Farmers Protest: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत, आंदोलनाचा दिला इशारा

Farm Mechanization: यांत्रिकीकरणाची खीळ काढा

SCROLL FOR NEXT