Sunflower Production : जागतिक सूर्यफुल उत्पादन यंदाही घटणार

अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने चालू आर्थिक जगातिक तेलबिया उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. पण रशिया आणि युक्रेन युध्दामुळे सूर्यफुल उत्पादनात १०.५ टक्क्यांची घट होण्याची शक्यताही व्यक्त केली.
Sunflower Production
Sunflower ProductionAgrowon
Published on
Updated on

पुणेः अमेरिकेच्या कृषी विभागाने (United State Department Of Agriculture) यंदा जागतिक तेलबिया उत्पादनात (Oil Seed Production) वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला. मात्र सूर्यफुल तेल उत्पादनात (Sunflower Oil Production) घट होणार आहे. जागतिक सूर्यफुल आणि सूर्यफुल तेल उत्पादनाला यंदाही रशिया आणि युक्रेन युध्दाचा (Russia Ukraine War) फटका बसेल, असाही अंदाज युएसडीएने व्यक्त केला आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने चालू आर्थिक जगातिक तेलबिया उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. पण रशिया आणि युक्रेन युध्दामुळे सूर्यफुल उत्पादनात १०.५ टक्क्यांची घट होण्याची शक्यताही व्यक्त केली. जगात मागील हंगामात ६ हजार ४६ लाख टन तेलबिया उत्पादन केले होते. तर यंदा उत्पादनात वाढ होऊन ६ हजार ४५६ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला.

Sunflower Production
Sunflower Market : जागतिक सूर्यफुल उत्पादन घटणार

सोयाबीनचे उत्पादन यंदा ९.८२ टक्क्यांनी वाढून ३ हजार ९०५ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. तर मोहरीचे उत्पादन यंदा जवळपास १५ टक्क्यांनी वाढणार असून ८४८ लाख टनांवर पोचेल, असाही अंदाज युएसडीएने व्यक्त केला.

गेल्या हंगामात जगात ५७३ लाख हजार टन सूर्यफुल उत्पादन झाले होते. ते यंदा ५१३ लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. सूर्यफुल उत्पादन आणि सूर्यफुल तेल निर्यातीत युक्रेन जगात आघाडीवर आहे. २०२०-२१ मध्ये एकूण जागतिक सूर्यफुल आणि सूर्यफुल उत्पादने निर्यातीत युक्रेन वाटा निम्मा होता. यावरून सूर्यफुल मार्केटमध्ये युक्रेनचे महत्व लक्षात येते.

Sunflower Production
Sunflower Production : खानदेशात सूर्यफुलाचे क्षेत्र वाढणार

मात्र रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने तेथील शेतीला फटका बसत आहे. तसेच निर्यातीसाठी महत्वाची असेलली बंदरे रशियाच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथील सूर्यफुल आणि सूर्यफुल तेल निर्यात ठप्प झाली. सध्याही या दोन्ही देशांमधील युध्द थांबलेले नाही. त्यामुळे केल्याने जगातिक सूर्यफुल पुरवठा कमी होणार आहे.

युध्दामुळे युक्रेनच्या सुर्यफुल आणि सुर्यफुल तेल तसेच पेंड निर्यातीत मोठी घट होणार आहे. मागील हंगामात युक्रेनमध्ये १७५ लाख टन सुर्यफुल उत्पादन झाले होते. ते यंदा १०१ लाख टनांवर स्थिरावणार अल्याचेही युएसडीएने म्हटले आहे.

रशियाचे उत्पादन वाढणार

यंदा जागतिक सूर्यफुल तेल उत्पादन २०१ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. मागीलवर्षी जागतिक सूर्यफुल तेल उत्पादन १९८ लाख टनांवर स्थिरावले होते. म्हणजेच यंदा उत्पादनात ३ लाख टनांची वाढ होणर आहे. यंदा रशियातील उत्पादन जवळपास ४ लाख टनाने वाढणार आहे. मागील हंगामात रशियात ५८ लाख टन सूर्यफुल तेल उत्पादन झाले होते. ते यंदा ६२ लाख टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

युक्रेनमधील उत्पादन घटणार

टर्कीचे उत्पादन वाढून ९ लाख टनांवरून १२ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. तर युक्रेनमधील सूर्यफुल तेल उत्पादन जवळपास साडेपाच लाख टनांनी घटून ४० लाख ८० हजार टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात युक्रेनमध्ये ४६ लाख टन सूर्यफुल तेल उत्पादन झाले होते, असेही युएसडीएने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com