Latur News: नाफेडच्या खरेदी केंद्रांव्यतिरिक्त शेतकरी उत्पादक गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून हमीभावाने सोयाबीनची खरेदी करण्यात येते. गेल्या वर्षी नाफेडच्या वतीने शेतकरी कंपन्या व गटांच्या खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती. या वर्षी महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने या केंद्रांना मंजुरी दिली असल्याने शेतकरी गट व कंपन्यांसोबत कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या खरेदी केंद्रांचा समावेश आहे. पणन मंडळाच्या लातूर विभागांतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांत १८२ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी सुरू झाली असून, या केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. .पणन मंडळाच्या लातूर विभागातील बीड, लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांत मिळून शेतकरी कंपन्यांकडून खरेदी सुरू आहे. या कंपन्यांना तूर, मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली असल्याने खरेदी सुरू आहे. बारदान्याची उपलब्धता व जवळच्या ठिकाणी सोयबीन विक्रीच्या सुविधेमुळे शेतकरी या कंपन्यांच्या केंद्रांना प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, काही केंद्रांवर चाळणी व हमालीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट होत आहे, तर काही केंद्रांवर चांगला प्रतिसाद मिळत आहे..Soybean Procurement: हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू .लातूर जिल्ह्यात : ८३, नांदेड : ४८, बीड : २४ धाराशिव जिल्ह्यात २७ केंद्रे आहेत. एकट्या लातूर जिल्ह्यात तूर, मूग, उडीद व सोयबीनची मिळून १२६ खरेदी केंद्रे असल्याचे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले..विभागातील सर्व केंद्रांकडे सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ९३ हजार ५४४ असून आतापर्यंत १९ हजार ७९५ शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीनची विक्री केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही खरेदी केंद्रे सुरू केली असून त्याला काही जिल्ह्यात चांगला, तर काही जिल्ह्यात शून्य प्रतिसाद आहे. काही बाजार समित्यांनी अडत व्यापाऱ्यांची नाराजी नको म्हणून केवळ नावालाच खरेदी केंद्रे सुरू केली आहेत..Soybean Farmers Protest: हमीभावासाठी किसान मोर्चाचे लातूर बाजार समितीसमोर धरणे .या केंद्रांच्या माध्यमातून शेतीमाल बाजारात विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना हमीभावाचा भक्कम पर्याय देण्याची संधी बाजार समित्यांना आहे. मात्र, काही बाजार समित्यांकडून केंद्रासाठी म्हणावा तेवढा उत्साह दाखवला जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे बाजारात सोयाबीनची हमीभावाच्या कमी दराने खरेदी सुरू असतानाच बाजार समित्यांच्या केंद्रावर सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीला प्रतिसाद नसल्याचेही उलट चित्र आहे..सोयाबीनच्या बाजारभावात वाढहमीभावाने सोयाबीनची खरेदी जोर धरत असतानाचा बाजारात सोयाबीनचे भाव व आवक स्थिर होती. लातूरच्या बाजारात मंगळवारपर्यंत (ता. १६) आवक १५ हजार क्विंटल, तर दर साडेपाच हजार क्विंटलपर्यंत स्थिर होते. बुधवारपासून (ता. १७) बाजारभावात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. बुधवारी सोयबीनची आवक १२ हजार ३२८ झाली, तर कमाल दर ४७२१ तर किमान भाव ४०८० रुपये होता. गुरुवारी (ता. १८) १४ हजार ३०९ क्विंटल आवक, तर कमाल भाव चारहजार सातशे व किमान भाव चार हजार १५० रुपये होता. शनिवारीही (ता.२०) सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती. कमाल भाव चार हजार ७५० व किमान भाव तीन हजार आठशे तर सर्वसाधारण भाव चार हजार ५५० रुपये होता..लातूर जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांची खरेदीशेतकरी कंपन्यांची खरेदी केंद्रे - ८३नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या - ४४ हजार २२५सोयाबीन खरेदी शेतकऱ्यांची संख्या - ७ हजार ९५सोयाबीन खरेदी क्विंटलमध्ये - एक लाख ९६ हजार ५६४खरेदीपोटी दिलेली रक्कम - पाच कोटी ५० लाख रुपये.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.