Kolhapur News: राज्याचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिन्याहून अधिक कालावधी झाला असला तरी अद्यापही १३२ कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीची पूर्ण रक्कम थकविली आहे. १५ डिसेंबरअखेर १८४ साखर कारखाने सुरू होते. त्यापैकी केवळ ५२ कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केली आहे. उर्वरित कारखान्यांपैकी मोठ्या संख्येने कारखाने अंशतःच एफआरपी देत असल्याचे चित्र आहे. .८० ते ९९ टक्के एफआरपी देणारे २२ कारखाने आहेत. ६० ते ८० टक्क्यांपर्यंत एफआरपी देणारे ८, तर ६० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे तब्बल १०२ कारखाने आहेत. कायद्याने दहा दिवसांत पूर्ण एफआरपी देणे बंधनकारक असताना १३२ कारखान्यांनी या कायद्याला केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे..Sugarcane Payment Delay: शेतकऱ्यांची बिले थकवली, 'काटामारी'चाही गंभीर प्रश्न, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी .अतिवृष्टीने ऊस उत्पादकांच्या उत्पादनात घट होत असताना कारखान्यांची रक्कम थकित ठेवण्याच्या भूमिकेमुळे ऊस उत्पादकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. थकबाकीदार कारखान्यांवर कारखानानिहाय कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे..१५ डिसेंबर २०२५ अखेर तब्बल २,७१९ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत २४८.०८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. या कालावधीत एकूण देय एफआरपी (वाहतूक व हाताळणी खर्चासह) ९,६५० कोटी रुपये इतकी आहे. त्यापैकी ७,०२६ कोटी रुपयेच अदा करण्यात आले आहेत. एकूण देय एफआरपीपैकी फक्त ७२.८१ टक्के रक्कमच शेतकऱ्यांना मिळाली आहे. अदा करण्यात आलेली रक्कम ६,९३१ कोटी रुपये असून, प्रत्यक्ष थकबाकी २,७१९ कोटी रुपये इतकी आहे..Sugarcane Payment: मांजरा कारखान्याकडून २७५० रुपयांचा हप्ता जमा.औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी जिल्ह्यांत यंदा ऊस उपलब्धता तुलनेने चांगली असली, तरी कारखान्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. त्यामुळे एफआरपी अदा करण्याची गती अत्यंत संथ आहे. काही कारखान्यांनी गळीत सुरू करूनही पहिला हप्ता पूर्ण न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे..कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये शेतकरी संघटनांचे प्राबल्य असल्याने अनेक कारखान्यांनी जाहीर केलेली एफआरपीची रक्कम पूर्ण दिली आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये अडचणी कायम आहेत. उसाची उपलब्धता व्हावी यासाठी खासगी कारखाने रक्कम पूर्ण देऊन उत्पादकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य जिल्ह्यांत सहकारी कारखाने एफआरपीची रक्कम देताना झुंजत असल्याचे चित्र आहे..कारवाई होत नसल्याचा आरोपहक्काच्या रकमेसाठी उत्पादकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. खत-बियाणे खरेदी, मजुरी आणि कर्जहप्ते भरणे कठीण झाले आहे. एफआरपी कायद्यानुसार ठरावीक कालावधीत पैसे न दिल्यास व्याज, दंड आणि गाळप परवाना निलंबन अशी तरतूद असतानाही कारवाई होत नसल्याचा आरोप उत्पादकांतून केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.