Sugarcane Farming Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Farming : नद्यांच्या पातळीत घट, ऊसशेतीसमोर उभे संकट

जिल्ह्यात महिनाभरापासून वाढलेल्या तापमानामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे. काही नद्यांची पात्रे कोरडी पडल्यामुळे त्या नद्यांवर अवलंबून असलेली ऊसशेती संकटात सापडण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Sugarcane Farming जिल्ह्यात महिनाभरापासून वाढलेल्या तापमानामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत (River Water Level) झपाट्याने घट झाली आहे. काही नद्यांची पात्रे कोरडी पडल्यामुळे त्या नद्यांवर अवलंबून असलेली ऊसशेती संकटात सापडण्याची शक्यता आहे.

यावर्षी परतीचा पाऊस लांबला होता. त्यानंतर अनेक गावांमध्ये पाणीपातळी कायम राहावी याकरिता मातीनाले बंधारे, वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि विविध सामाजिक संस्थांनी राबविला.

त्यामुळे पाणीपातळी टिकून राहील असा अंदाज होता. परंतु या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा बसू लागल्या.

मार्च, एप्रिलमध्ये तर अनेकदा पारा ३९ अंशाच्या वर गेला. सातत्याने वाढलेल्या तापमानाचा परिणाम त्या त्या वेळी आंबा, काजू यांसह विविध फळपिकांवर दिसून आला. परंतु त्यापेक्षा अधिक भयावह परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे.

वैभववाडीतील शुक, शांती, गोठणा, कुसूर, करूळ, कणकवलीतील जानवली, गडनदी या नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. वैभववाडीतील शुक नदीचे पात्र कोरडे पडले असून, त्यामुळे या नदीवर अवलंबून असलेली ऊसशेती संकटात सापडण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील काही विहिरीतील पाणीसाठ्याचा अंदाज प्रतिनिधिक स्वरूपात घेण्यात आला होता. त्या वेळी समाधानकारक साठा दिसून आलेला होता. अद्याप पाणीटंचाईचे चित्र जिल्ह्यात नाही. मात्र पाऊस लांबल्यास नेमके चित्र काय असेल हे आता सांगता येणार नाही. परंतु आम्ही पाण्याच्या स्थितीची माहिती घेत आहोत.-
सागर देसाई, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक, सिंधुदुर्ग
शुक नदीचे पाण्यात प्रचंड घट झाली आहे. या नदीच्या पाण्यावर शेकडो शेतकऱ्यांची ऊसशेती अवलंबून आहे. तर दुसरीकडे गोठणा नदीचे पाणीदेखील आटले आहे. त्यामुळे ऊसशेती संकटात सापडण्याची शक्यता आहे. सध्या नदीतील पाणी आम्ही आळीपाळीने शेतकरी उसाला पुरवीत आहोत.
- राजाराम लाड, ऊस उत्पादक शेतकरी, नापणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT