Sugarcane Farming : ऊस शेतीतील नवीन प्रयोगांकडे तरुणांची फायद्याची

ऊस शेतीमधील नवे बदल टिपण्यासाठी विशेषतः तरुण शेतकऱ्यांची सुरू असलेली धडपड माळेगावातील ऊस पीक परिसंवादाच्या निमित्ताने दिसून आली.
Agrowon Anniversary
Agrowon Anniversary Agrowon

Agrowon Anniversary Malegaon : ऊस शेती (Sugarcane Farming) आणि पूरक व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे ऊस शेतीमधील नवे बदल टिपण्यासाठी विशेषतः तरुण शेतकऱ्यांची सुरू असलेली धडपड माळेगावातील ऊस पीक परिसंवादाच्या निमित्ताने दिसून आली.

उसाच्या चांगल्या उत्पनासाठी पीक फेरपालट पद्धत, माती परीक्षण, पूर्वमशागत आणि शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर, बेवडचे महत्त्व आदी गोष्टी जाणून घेण्यासाठी हजारो शेतकरी एकवटल्याचा आनंद होतो.

तरुणाई हे शेतीचे भविष्य आहे आणि शेतीतील नावीन्य शोधण्यासाठी ते पुढे येत असल्याची महत्वपूर्ण बाब आहे, असे प्रतिपादन सातत्याने एकरी शंभर टन ऊस काढणारे शेतीतज्ज्ञ सुरेश अप्पासाहेब कबाडे यांनी व्यक्त केले.

माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गुरुवारी (ता. २०) ॲग्रोवनच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित ऊस पीक परिसंवादामध्ये ऊस शेतीतज्ज्ञ सुरेश कबाडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळेगाव कारखान्याचे प्रमुख बाळासाहेब तावरे होते.

‘सातत्यपूर्ण एकरी १०० टन ऊस उत्पादन’ या विषयाच्या अनुषंगाने श्री. कबाडे यांनी माळेगाव येथील शेतकऱ्यांना विविध मुद्द्यांच्या आधारे गुरुकिल्ली दिली.

त्यामध्ये ऊसाच्या चांगल्या उत्पन्नासाठी पीक फेरपालट पद्धत, बेवडचे महत्त्व, उसाच्या पाचटाचा उपयोग, सबसॉलरचा फायदेशीर वापर, माती परीक्षण, पूर्व मशागत, शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर, हिरवळीच्या खताचा वापर, चर घेऊन मातीआड खते टाकण्याची पद्धत, बेडप्रकिया, ऊस लागवड पद्धत, लावणीचा बेसल डोस आदी मुद्यांच्या आधारे श्री. कबाडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Agrowon Anniversary
Sugarcane Crushing : नांदेड विभागात का झाले साखरेचे उत्पादन कमी?

अध्यक्ष बाळासाहेब तावरे म्हणाले, ‘‘कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतीमध्ये आगामी काळात यांत्रिकीकरणाबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर वाढवावा लागणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान, मिनी रोबो ट्रॅक्टर, ऊस तोडणी हार्वेस्टर ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी, शेतीच्या माध्यमातून ग्रामविकासाची ताकद वाढविण्यासाठी ‘अॅग्रोवन’ महत्त्वपूर्ण काम करीत आहे.

Agrowon Anniversary
Sugarcane Production : दौंडच्या चोरमले कुटुंबाने सेंद्रिय कर्ब आणि यांत्रिकीकरणातून ऊस उत्पादनात साधली वाढ

त्याचाच एक भाग म्हणून ॲग्रोवनने माळेगावात घेतलेल्या ऊस पीक परिसंवादाला महत्त्व प्राप्त होते.’’ यारा फर्टिलायझर इंडिया प्रा. लि. चे सागर मस्के यांनीही उपस्थितांना खत व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.

या वेळी दै. ‘सकाळ’ पुणे विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक योगेश निगडे, कारखान्याचे उपाध्यक्ष सागर जाधव, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप, तानाजी कोकरे, रंजन तावरे, योगेश जगताप, अॅड. केशवराव जगताप, संजय काटे, अनिल तावरे, मदनराव देवकाते, नितीन सातव, राजेंद्र ढवाण, तानाजी देवकाते, अविनाश गोफणे, अविनाश देवकाते, शेतकी अधिकारी सुरेश काळे, सुरेश देवकाते आदी उपस्थित होते.

माळेगावचे शंभर टनांपर्यंत उसोत्पादन घेणारे मानकरी...

माळेगाव साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ हंगामात पाच शेतकऱ्यांनी एकरी शंभर टनांपर्यंत ऊस उत्पादन घेतले आहे. त्यामध्ये अॅड. केशवराव सर्जेराव जगताप (शिरष्णे), विठ्ठल हरी कोकरे (पणदरे), प्रदीप जगताप, नंदकुमार जगताप (दोघे धुमाळवाडी), तृप्ती प्रकाश देवकाते, मोहन प्रकाश देवकाते (दोघे निरावागज) यांचा सन्मान अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या हस्ते करण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com