Sugarcane Harvesting
Sugarcane Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Conference : बामणीत १२ मार्चला ऊस विकास परिषद

Team Agrowon

Sugarcane Conference कोल्हापूर ः महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने १२ मार्चला राज्यस्तरीय ‘ऊस विकास परिषद’ (Sugarcane Development Conference) बामणी (ता. कागल) येथे होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने-पाटील व किरण चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत ही परिषद होईल. या वेळी विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

ऊस शेतीमधील समस्या वाढत आहेत. या समस्यांवर उपाययोजना करण्यासाटी ऊस शेतीतील विचारवंत आणि ऊस शेतीशी पूरक उद्योजक एकत्र येऊन चर्चा करणार आहेत. कृषिभूषण संजीव माने, उत्तमराव परीट, सत्यजित भोसले आदी तज्ज्ञांचे परिषदेत मार्गदशन होणार आहे.

या वेळी महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रतील प्रगतिशील उस उत्पादकांना ‘ऊस भूषण कार्यगौरव’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र ऊस विकास कार्यगौरव, महाराष्ट्र आदर्श कृषी पत्रकार कार्यगौरव आदी पुरस्कारांनी विविध मान्यवरांना गौरवण्यात येईल.

दै. ‘सकाळ’ ‘ॲग्रोवन’चे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार चौगुले यांनाही महाराष्ट्र आदर्श कृषी पत्रकार कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ऊस विकास परिषदेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन माने-पाटील यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT