Bhagirath Prayas
Bhagirath Prayas Agrowon
ताज्या बातम्या

Bhagirath Prayas Scheme : ‘भगीरथ प्रयास’साठी राजस्थानमधील कामांचा अभ्यास

Team Agrowon

नाशिक : जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) जिल्हा परिषदेमार्फत ‘मिशन भगीरथ प्रयास योजना’ (Bhagirath Prayas Scheme ) हाती घेण्यात आली आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी नुकताच राजस्थान दौरा केला. 

अलवर भागात कामांची पाहणी केली. यानंतर आता जनजागृती आणि प्रबोधनावर जिल्हा परिषदेने भर देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गावागावांत बैठका घेऊन प्रबोधन केले जाणार आहे. यात मजुरांना गावातच काम देऊन त्यांचे होणारे स्थलांतरदेखील रोखले जाणार आहे.

जिल्हा परिषदमार्फत ‘मिशन भगीरथ प्रयास योजने’करिता एकदिवसीय कार्यशाळा झाली. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी राजस्थानात केलेल्या जलसंधारण कामांची यशोगाथा कथन केली.

त्यासाठी केलेल्या उपाययोजनांची व नियोजनाची माहिती दिली. त्याअनुषंगाने लघुपाटबंधारे विभागांतर्गत २६ अधिकारी व कर्मचारी यांनी अलवर येथे झालेल्या जलसंधारण कामांची पाहणी दौरा नुकताच केला.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, लघुपाटबंधारेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार यांच्यासह २६ अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता.

या पथकाने काही गावांमध्ये कामांची पाहणी केली. डॉ. राजेंद्र सिंह यांच्याशी चर्चा केली. गावागावांतील प्रबोधन, लोकांचा सहभाग या जोरावर ही योजना यशस्वी केल्याचे या वेळी सांगण्यात आले.

आता याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातही जनजागृती व प्रबोधन जिल्हा परिषदेमार्फत केले जाणार आहे. गावात बंधारे, दुरुस्ती कामे करण्यासाठी मार्च ते जून या चार महिन्यांचा कालावधी आहे.

मात्र या कालावधीत टंचाई असल्याकारणाने सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण या तालुक्यांमधून मजुरांचे स्थलांतर होते. ते होऊ नये, यासाठी गावामध्येच त्यांना नरेगांतर्गत काम उपलब्ध करून दिले जाणार आहे. योजनेअंतर्गत पेठ व सुरगाणा येथे कामांना सुरुवात झाली आहे.

मजुरांना गावातच कामे देण्यावर भर द्यावा

विभागप्रमुख-गटविकास अधिकारी यांच्या झालेल्या समन्वय बैठकीतही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रामुख्याने मजुरांचे स्थलांतर होणार नाही, यासाठी योग्य ते नियोजन करा, अशा सूचना केल्या आहेत. गावांमध्ये ‘नरेगां’तर्गत कामे आहे. यात मजुरांना गावातच कामे देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

Crop Loan Distribution : तीन हजार कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

SCROLL FOR NEXT