Rain Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : वादळी पावसाचा इशारा

राज्यात उन्हाळा हंगामाला सुरूवात झाल्याने कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाच्या झळा वाढत आहेत.

Team Agrowon

Weather Update पुणे : उन्हाचा चटका वाढला असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने ढगाळ हवामान (Cloudy Weather) होत आहे. आज (ता. ५) राज्यात पावसाचा अंदाज आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा (Rain Forecast) देण्यात आला आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही विजांसह पावसाचा अंदाज आहे. राज्यात उन्हाचा चटका देखील कायम राहणार आहे.

राज्यात उन्हाळा हंगामाला सुरूवात झाल्याने कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाच्या झळा वाढत आहेत. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे देखील तापदायक ठरत आहे.

शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी, बुलडाणा, अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.२ अंश, तर वाशीम, अमरावती, नांदेड, जळगाव, रत्नागिरी येथेही ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या किमान तापमान वाढल्याने थंडी नाहिसी झाली आहे. शनिवारी (ता. ४) राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा १३ अंशांच्या पुढे गेला आहे. आज (ता. ५) राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे.

राज्यात गारपिटीची शक्यता

गुजरात आणि परिसरावरील चक्राकार वारे तसेच वाऱ्यांच्या मधल्या थरात असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. वादळी पावसाबरोबरच मंगळवारपर्यंत (ता. ७) राज्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नगर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT