Team Agrowon
उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक फटका मध्य आणि उत्तर भारताला बसण्याची शक्यता आहे.
यंदा सलग दुसऱ्या वर्षी उष्णतेची लाट आली तर गहू, मोहरी आणि हरभऱ्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
मार्च महिना हा अनेक रब्बी पिकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो.
कारण त्यावेळी पिकांच्या वाढीची संवेदनशील अवस्था असते. या काळात तापमान जास्त राहिलं तर पिकाची वाढ नीट होत नाही.
गहू, हरभऱ्यासारख्या पिकांना जास्त तापमान चालत नाही.
वाढत्या तापमानामुळे गव्हाच्या पिकाला आताच ताण बसू लागला आहे.
मार्च महिन्यात उष्णता जास्त वाढली तर उत्पादनात नक्कीच घट होईल.
भारतात प्रामुख्याने उत्तर भारतात गव्हाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.