Seed Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Seed : राज्यात बोगस बियाण्यांच्या रॅकेटमुळे शेतकऱ्यांची फसवणूक

Dhananjay Munde : आमदार धनंजय मुंडे यांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना पत्र लिहून कारवाईची मागणी

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात शेतकऱ्यांची सोयाबीन, कपाशी यासह विविध बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. याचाच फायदा घेऊन अनेक प्रकारचे बोगस बियाणे राज्यभरात बाजारात आणून प्रसिद्ध ब्रँडची नावे वापरून, चढ्या भावाने विक्री केली जात आहे.

शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक टाळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे कृषिमंत्र्यांकडे केली आहे.

श्री. मुंडे यांच्या पत्रानुसार, १ जूनच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील चिखली एमआयडीसी परिसरात छत्रपती संभाजीनगर येथील एका नामांकित कंपनीच्या नावाचे बोगस बियाणे कृषी विभागाने जप्त केले होते. त्यांची किंमत दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते.

याच प्रकारचे बोगस बियाण्यांचे रॅकेट राज्यभरात सर्वत्र सक्रिय झालेले आहेत. याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होऊ शकते.

मात्र या रॅकेटचा संपूर्ण बंदोबस्त करून यावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला अद्याप यश आले नसल्याचे श्री. मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

कपाशीच्या लोकांची मागणी असलेल्या वाणाच्या एका बॅगची किंमत ८५० रुपयांच्या आसपास आहे, मात्र हे बियाणे दोन हजार रुपयांपेक्षा अधिक भावाने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

शेतकऱ्यांनी भावावरून दुकानदारास विचारणा केल्यास दुकानदार सरळ सदर बियाणे संपले आहे, असे सांगून मोकळे होतात. अशा पद्धतीने चढ्या भावाने विक्री व साठेबाजी केली जात असल्याची माहितीही श्री. मुंडे यांनी दिली आहे.

आधीच अनेक संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांची ऐन खरिपाच्या तोंडावर फसवणूक होऊ नये, यासाठी शासनाने कृषी निविष्ठा दुकानांवर करडी नजर ठेवण्यासाठी अधिकची विशेष पथके नेमावीत, तसेच आवश्यक सर्व उपाययोजना, धाडी व धडक कारवाया करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT