Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Sowing : जुन्नर तालुक्यात सोयाबीन पेरणीच्या कामांना वेग

Kharif Season : जुन्नर तालुक्यात खरीप पिकांच्या पेरणीची कामे सध्या जोरात सुरू आहेत. बहुतांश शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाकडे जास्त कल असल्याचे पहावयास मिळते.

Team Agrowon

Pune News : जुन्नर तालुक्यात खरीप पिकांच्या पेरणीची कामे सध्या जोरात सुरू आहेत. बहुतांश शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाकडे जास्त कल असल्याचे पहावयास मिळते. अजून पुरेसा पाऊस झाला नाही तरी आज ना उद्या पाऊस होईल, या आशेने शेतकरी बांधव पेरणी करत असल्याचे पहावयास मिळते.

काही ठिकाणी धूळ वाफेवर पेरणी केलेली पिके उगवून आली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये अंतर मशागती नंतर दोन ते अडीच फुटाच्या सऱ्या काढून वरंब्याच्या दोन्ही बाजूला टोकण पद्धतीने सोयाबीनची लागवड केली आहे.

या पद्धतीमध्ये कमी बियाण्यात लागवड होऊन उत्पादन चांगले मिळत असून उत्पादन खर्च कमी होत असल्याचे शेतकरी सांगतात.

साधारणपणे एक एकर क्षेत्रामध्ये पेरणीसाठी सोयाबीनचे २० ते २२ किलो तर टोकण पद्धतीने लागवडीसाठी १२ ते १५ किलो बियाणे लागते.

शिवाय जास्त पावसात पेरणी करणे शक्य होत नाही, अशावेळी सरीवर टोकन पद्धतीची लागवड करणे सहज शक्य होते.

...या वाणांना मागणी

सध्या बाजारात सोयाबीन बियाण्याच्या विविध प्रजाती उपलब्ध असून `केडीएस ७२६`, `फुले संगम`, `फुले दूर्वा`, `केडीएस ७५३`, `फुले किमया` या जातींना विशेष मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT