Kharif Sowing : पाऊस लांबल्याने धास्ती

Kharif Season : जिल्ह्यात जुलैचा पहिला आठवडा उजडूनही पावसाने अद्याप सुरुवात केलेली नाही. त्यामुळे खरिपातील पेरण्या रखडल्या आहेत.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Nanded Rain Update : नांदेड : जिल्ह्यात जुलैचा पहिला आठवडा उजडूनही पावसाने अद्याप सुरुवात केलेली नाही. त्यामुळे खरिपातील पेरण्या (Sowing) रखडल्या आहेत.

पेरणीची वेळ टळून जात असल्याने उत्पादनात घट येण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. पावसाची प्रतीक्षा करत शेतकरी आकाशाकडे नजर लावून आहेत.

नांदेड जिल्ह्यात दरवर्षी जूनच्या पहिल्या हप्त्यातच दमदार पावसाची सुरुवात होते. यामुळे जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून खरिपातील पेरण्यांच्या कामांना सुरुवात होते. जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्यांची कामे आटोपून शेतकरी आंतरमशागतीच्या कामांना लागतात. परंतु यंदा मात्र खरिपातील पेरण्यांचे चित्र पालटले आहे.


जूनमध्ये सरासरीच्या ३० टक्के पाऊस झाल्याने धरणसाठ्याची स्थिती ‘जैसे थे’च आहे. तर खरिपातील पेरण्यांचे कामही रखडले आहे. काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल, या आशेवर पेरण्यांची कामे आटोपून घेतली. परंतु पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्यामुळे त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न उद्‍भवला आहे.  

Kharif Sowing
Kharif Sowing : पेरण्या लांबल्याने कृषी निविष्ठांचा साठा पडून

दोन मंडलांत अतिवृष्टी
जिल्ह्यात रविवारी (ता. २) तुरळक भागात पाऊस झाला. हा पाऊस देगलूर व मुखेड तालुक्यांतील काही मंडलांत चांगला झाला. देगलूर तालुक्यातील देगलूर मंडलांत ७५ मिलिमीटर तर नरंगल बुद्रुक मंडलात ७४.५ मिलिमीटर पाऊस झाला.

तर त्याच दिवशी मुक्रमाबाद मंडलात २८.६ मिलिमीटर, बाऱ्हाळी १९.३, चांडोळा १५.३, खानापूर ३६, मरखेड १७.३, माळेगाव मक्ता १७.८, हाणेगाव १७.८, शाहापूर ११.५, मालेगाव १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com