Soybean Rate agrowon
ताज्या बातम्या

Soybean Rate : सोयाबीन उत्पादनाबरोबर दरही घटला, सांगा शेतकऱ्यांनी करायचं काय?

sandeep Shirguppe

Soybean Rate Maharashtra : राज्यात खरीप हंगामात सोयाबीन आणि भूईमुगाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते परंतु मागच्या काही वर्षांत खरीप हंगामातील सोयाबीनसह इतर पिकांना मोठा फटका बसत आहे. मागच्या ५ वर्षांत सोयाबीन पीक अस्मानी संकटाला बळी पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

तर यंदाही पाऊस कमी असल्याने सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. यामुळे सोयाबीनला चांगला दर मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती परंतु मागच्या काही दिवसांत सोयाबीनचा दर ५ हजारांवर जात नसल्याने यंदाही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच असल्याचे दिसून येत आहे.

मागच्या तीन वर्षांतील दराचा विचार केल्यास सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठी अडचण झाल्याचे चित्र आहे. जागतिक बाजारात पाच ते सहा हजार रुपये क्विंटलने सोयाबीनची विक्री करावी लागली होती. दरम्यान खरीप पिकांची काढणी सुरू होते परंतु दर नसल्याने शेतकरी सोयाबीन पीक आपल्याच शेतात खत म्हणून वापर करण्याच्या मनस्थितीत आहे. तर दुसरीकडे सोयाबीनवर यलो मोझॅकचा मोठा प्रादुर्भाव होत असल्याने हाताशी आलेलं पीक वाया जाण्याची भिती शेतकऱ्याला सतावत आहे.

राज्यात लाखो हेक्टरवर सोयाबीन पिकाचे उत्पादन घेतले आहे. मागच्या काही दिवसांत विदर्भात झालेल्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तर परभणी, नांदेड परिसरात यलो मोझॅकचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्राची झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, जिल्ह्यात भातासह सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते परंतु सोयाबीनला दर नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

परंतु अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही पीक काढणीला आले की दर कोसळतात. वर्षभरात दरात वाढ होईल, या आशेपोटी शेतकरी वर्षभर घरात सोयाबीन ठेवतो.

विकास संस्था, बँकांकडून काढलेल्या पीक कर्जाचे व्याज भरतो, पण चार पैसे चांगले मिळतील, म्हणून तो बाजारात नेत नाही. गेल्या दोन वर्षांत सोयाबीनने सहा हजार रुपये क्विंटलच्या पुढे झेप घेतलेलीच नाही. त्यामुळे यंदा ४४ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र आले आहेत. पेरणी कमी होऊनही बाजारात दर नाही. सध्या घाऊक बाजारात सरासरी ४८३० रुपये प्रतिक्विंटल दर आहे.

कमी पावसाचा उत्पादनांना फटका

यंदा अल निनोमुळे पावसाने पाठ फिरवली यामुळे खरीप पिके अडचणीत आली आहेत. त्यामुळे भात, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग या पिकांच्या उत्पादनात घट होणार असल्याची आकडेवारी समोर येत आहे. यामध्ये सर्वाधिक फटकाक सोयाबीनला बसणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गोडेतेलावर सोयाबीनचा दर अवलंबून

जागतिक बाजारपेठेत गोडेतेलाला तेजी आली की सोयाबीनच्या दरात वाढ होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून गोडेतेलाच्या दरात घसरण सुरू असल्याने सोयाबीनचे दरही कमी होऊ लागले आहेत. सध्या सणासुदीचा काळ असल्याने गोडेतेलाच्या किंमतीही वाढण्याची शक्यता कमी असल्याने ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामात सोयाबीनचा दर पडला आहे.

गेल्या पाच दिवसांतील सोयाबीनचे दर, प्रतिक्विटल असे

२६ सप्टेंबर -४७५०, २७सप्टेबर - ४८००, २८ सप्टेंबर ४८३०, २९ सप्टेंबर ४८४०, ३० सप्टेंबर ४८६०, मागच्या एक आठवड्यात फक्त ११० रुपये दर वाढला आहे. तर मागच्या काही वर्षांत खतांच्या किंमती, तसेच शेतीच्या मशागतीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना हा दर परवडणारा नसल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : तापमानवाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : मुख्यमंत्री शिंदे

Bamboo Farming : पृथ्वी रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त : पाशा पटेल

Agriculture PG Admissions : कृषी ‘पदव्युत्तर’ अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Fish Production : पर्ससीन, एलईडी मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात घट

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

SCROLL FOR NEXT