Latur News : विभागातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २७,६६,९५४ हेक्टर असून २७,९२,०१४ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या १०१ टक्के प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सर्वाधिक पेरणी झालेल्या सोयाबीनच्या उत्पादनात ५० ते ६० टक्के, तर कपाशीच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घटीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
लातूर विभागात मागील सप्ताहात हवामान उष्ण व ढगाळ होते. लातूर विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ मिलिमीटर असून १४ सप्टेंबरपर्यंत ५०२.९० मिलिमीटर इतका पाऊस झाला. तो १४ सप्टेंबरच्या सरासरीच्या ७६.८० टक्के असून वार्षिक सरासरीच्या ६२ टक्के आहे.
लातूर विभाग पीक परिस्थिती
खरीप ज्वारी : सरासरी क्षेत्र ९४,१७८ हेक्टर असून २३,१०८ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या २५ टक्के आहे. पीक सध्या वाढीच्या ते पोटरी अवस्थेत असून पावसाच्या खंडामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. सद्यःस्थितीत ज्वारी पिकाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येण्याची शक्यता आहे.
बाजरी ः सरासरी क्षेत्र ११,८४२ हेक्टर असून २४१४ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली. पीक सध्या वाढीच्या ते पोटरी अवस्थेत असून पावसाच्या खंडामुळे पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजरी पिकाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येण्याची शक्यता आहे.
मका ः सरासरी ः क्षेत्र ३०,९६५ हेक्टर असून १२,५१८ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे (४० टक्के). पीक सध्या वाढीच्या ते तुरा बाहेर पडण्याच्या अवस्थेत असून पावसाच्या खंडामुळे पिकाच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. मका पिकाच्या उत्पादनात २५ ते ३० टक्के घट येण्याची शक्यता आहे.
मूग ः सरासरी क्षेत्र ९६,८४१ हेक्टर असून ४०,२६० हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली. पीक सध्या काढणी अवस्थेत असून काढणी सुरू झाली आहे. मूग पिकाच्या उत्पादनात ५० ते ६० टक्के घट येण्याची शक्यता आहे.
उडीद ः सरासरी क्षेत्र ९८,९२७ हेक्टर असून ५४,०३३ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. पीक सध्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे उत्पादनात ५० ते ६० टक्के घट येण्याची शक्यता आहे.
तूर ः सरासरी क्षेत्र ३,४९,२५३ हेक्टर असून २,३५,१४९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. पीक सध्या वाढीच्या ते फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे. पावसाच्या खंडामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम झाला असून, उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येण्याची शक्यता आहे.
सोयाबीन : सरासरी क्षेत्र १५,७१,८६८ हेक्टर असून १९,८०,०९९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. पीक सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही ठिकाणी सोयाबीन पिकावार विषाणूजन्य पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे उत्पादनात ५० ते ६० टक्के घट येण्याची शक्यता आहे.
कापूस : सरासरी क्षेत्र ४,८५,०८८ हेक्टर असून ४,३६,५१६ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. पीक सध्या पाते, फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. काही ठिकाणी गुलाबी बोंडअळीचे पतंग व अंडी दिसून येत आहेत. पावसातील खंडामुळे पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम दिसून येत असून उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.