अॅग्रोवन वृत्तसेवा
Soybean Market : हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारातील (भुसार माल मार्केट) सोयाबीनच्या दरात गेल्या काही दिवसांत किंचित चढउतार होत आहेत.
बुधवारी (ता. १४) सोयाबीनची ५५० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४५५५ ते कमाल ४९९० रुपये तर सरासरी ४७७२ रुपये दर मिळाले.
खरीप हंगामाच्या तोंडावर बियाण्यांसाठी मागणी वाढेल परिणामी दरात सुधारणा होईल, अशी अपेक्षा अद्याप एकही दाणा सोयाबीन विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना होती. परंतु लांबलेला पाऊस तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे राखीव ठेवले आहे.
त्यामुळे बाजारातील सोयाबीनला उठाव नाही. गेल्या काही आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात नरमाईच आहे. किंचित सुधारणा होऊन सोमवारी (ता. १२) दिवसात कमाल दर पाच हजारांवर गेले होते. परंतु गेल्या दोन दिवसांत दरात किंचित घट झाल्याचे दिसत आहे.
हिंगोली धान्य बाजारात मंगळवारी (ता. १३) सोयाबीनची ९५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४६०० ते कमाल ४९६५ रुपये दर सरासरी ४७८२ रुपये दर मिळाले.
सोमवारी (ता. १२) सोयाबीनची ६०६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५०१८ रुपये तर सरासरी ४८०९ रुपये दर मिळाले.
शनिवारी (ता. १०) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४६०० ते कमाल ४९५१ रुपये तर सरासरी ४७७५ रुपये दर मिळाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.