Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीनला ४८०० ते ५२०० रुपये

हिंगोली बाजार समितीतील भुसार माल मार्केटमध्ये सोमवार (ता.२७) ते शनिवार (ता.४) या कालावधीत सोयाबीनची ४७४० क्विंटल आवक झाली.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती (Hingoli APMC) अंतर्गत धान्य बाजारात (भुसार माल मार्केट) शनिवारी (ता.४) सोयाबीनची (Soybean Rate) ५०० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५२०० रुपये तर सरासरी ५००० रुपये दर मिळाले.

हिंगोली बाजार समितीतील भुसार माल मार्केटमध्ये सोमवार (ता.२७) ते शनिवार (ता.४) या कालावधीत सोयाबीनची ४७४० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ४६९९ ते कमाल ५२५७२ रुपये दर मिळाले.

Soybean Rate
Soybean Rate : सुर्यफूल तेलाच्या आयात बंदीने सोयाबीनच्या दराला आधार मिळणार ?

शुक्रवारी (ता.३) सोयाबीनची ८०५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५१९० तर सरासरी ४९९५ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.२) सोयाबीनची ८३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८५० ते कमाल ५१७० रुपये तर सरासरी ५०१० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता.१) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४६९९ ते कमाल ५१४१ रुपये तर सरासरी ४९२० रुपये दर मिळाले.

Soybean Rate
Soybean Rate : सुर्यफूल तेलाच्या आयात बंदीने सोयाबीनच्या दराला आधार मिळणार ?

मंगळवारी (ता.२८) सोयाबीनची १००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०५ ते कमाल ५२२५ रुपये तर सरासरी ५०१५ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २७) सोयाबीनची ८०५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५२५७ रुपये तर सरासरी ५०२८ रुपये दर मिळाले.

शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग

मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोयाबीनची आवक वाढली आहे. सहा हजार रुपयांचे दर मिळतील या आशेने सोयाबीन साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचे अपेक्षित दर मिळत नसल्याने नुकसान सोसावे लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com