Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : खानदेशात पेरणीला गती

Kharif Season : खानदेशात पावसामुळे पेरणीला मागील तीन दिवसांपासून चांगली गती आली आहे. पेरणी ५० टक्क्यांवर पोचली असून, सर्वाधिक लागवड किंवा पेरा कापसाचा आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पावसामुळे पेरणीला मागील तीन दिवसांपासून चांगली गती आली आहे. पेरणी ५० टक्क्यांवर पोचली असून, सर्वाधिक लागवड किंवा पेरा कापसाचा आहे. पेरणी सुरूच असून, सोयाबीनचा पेराही उद्दिष्ट गाठू शकतो, असे दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सरासरी ६७.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जुलैमध्येही पाऊस नव्हता. मात्र, बुधवार (ता. ५) व गुरुवार (ता. ६) व शुक्रवारी (ता.७) पेरणीयोग्य पाऊस झाल्याने सर्वच ठिकाणी पेरण्यांना गती आली आहे.

या पावसामुळे ४९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक पेरा कापसाचा ६६ टक्के आहे. यात बागायती कापसाचा पेरा ५० टक्के आहे. गेल्या २४ तासांत (सकाळी आठपर्यंत) २४.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या महिन्यात ३५ टक्के पाऊस झाला. जूनचे २६ दिवस पावसाअभावी कोरडे गेले. नंतर थोडाफार पाऊस झाला.

मात्र, शेतकऱ्यांना ५ जुलैपर्यंत दमदार पावसाची प्रतीक्षा होती. बुधवारी व गुरुवारी दमदार पाऊस झाल्याने शेतकरी पेरण्या पूर्ण करण्यासाठी सरसावले आहेत. जो-तो पेरण्या पूर्ण कशा होतील, यासाठी मजुरांची जुळवाजुळव करण्यात गुंतला आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी कापसाच्या पेरण्या ५० टक्के केल्या. त्या आता शंभर टक्के पूर्ण होतील. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या.

आता पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. शेतात सर्वत्र पेरण्यांचे चित्र दिसत आहे. आतापर्यंत कापसाचा पेरा तीन लाख ३३ हजार ५२९ हेक्टरवर झाला आहे. सोयाबीनचा पेरा चार हजार हेक्टरवर, तर भुईमुगाचा पेरा तीन हेक्टरवर झाला आहे. उडीद, मूग, तुरीच्या पेरण्या झालेल्या नाहीत. आतापर्यंत तीन लाख ७८ हजार ६३० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

१५ जुलैपर्यंत पेरण्या करता येतील

उडीद, मूगवगळता कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तूर या पिकांच्या पेरण्या १५ जुलैपर्यंत करता येतील. आता मात्र पावसाने वेग घेतला आहे. यामुळे रखडलेल्या पेरण्या पूर्ण होतील, अशा आशावाद शेतकरी व्यक्त करीत आहेत.

जळगावातील पेरण्या अशा

तालुका पेरण्या (हेक्टर) टक्केवारी

जळगाव २५ हजार २६ ४४

भुसावळ १२ हजार ९९४ ४५

बोदवड १६ हजार ४८८ ५०

यावल आठ हजार ७२४ २०

रावेर १६ हजार ५५८ ५६

मुक्ताईनगर १४ हजार ५६६ ४९

अमळनेर ४२ हजार ४०० ६१

चोपडा ४० हजार ४६७ ६३

एरंडोल २९ हजार ९९० ७६

धरणगाव १९ हजार २६७ ४३

पारोळा ३५ हजार ९११ ६९

चाळीसगाव २३ हजार ६८० २७

जामनेर ६८ हजार १९ ६८

पाचोरा २२ हजार ९०० ४०

भडगाव एक हजार ६४० ५

एकूण तीन लाख ७८ हजार ६३० ४९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT