Rabi Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : दोन हजार ८०० हेक्टरवर रब्बीतील ज्वारीची पेरणी

जिल्ह्यात पाऊस सतत सुरू असला तरी काही ठिकाणी रब्बी ज्वारीच्या पेरणीला सुरुवात झाली आहे.

टीम ॲग्रोवन

नगर ः जिल्ह्यात पाऊस सतत (Rainfall) सुरू असला तरी काही ठिकाणी रब्बी ज्वारीच्या पेरणीला (Rabi Crop) सुरुवात झाली आहे. यंदा सरासरी ४ लाख ५८ हजार ६३६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. किमान सरासरी एवढ्या क्षेत्रावर पेरणीचा कृषी विभागाचा (Department Of Agriculture) अंदाज आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २ हजार ८६१ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात रब्बीत सर्वाधिक ज्वारीचे क्षेत्र असते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मात्र ज्वारीचे क्षेत्र झपाट्याने घटत आहे. मागील काही वर्षांत ज्वारीची साधारण चार लाख हेक्टरवर पेरणी होत होती. गेल्या वर्षी मात्र त्याच्या निम्मीही पेरणी झाली नाही.

यंदा कृषी विभागाने ज्वारीचे २ लाख ६७ हजार ८३४ हेक्टर सरासरी क्षेत्र निश्‍चित केले आहे. साधारणपणे काही भागांत ज्वारीची ऑगस्टमध्येच पेरणी होत असते. सध्या बहुतांश भागात सातत्याने पाऊस सुरू आहे.

तरीही आतापर्यंत रब्बी ज्वारीची २ हजार ८६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा हरभऱ्याचे ८८ हजार ३७७, गव्हाचे ८६ हजार ४०५, मक्याचे १४ हजार ११८ हेक्टर सरासरी क्षेत्र निश्‍चित केले आहे.

वाफसा होताच येणार पेरण्यांना वेग

करडई, जवस, तीळ, सूर्यफूल या पिकांची पेरणीच होत नसल्याने सरासरी क्षेत्र कमी आहे. कांद्याच्या लागवडीलाही सुरुवात झाली आहे. आतापर्यंत २१ हजार २०० हेक्टरवर रब्बी कांदा लागवड झाली आहे. सततच्या पावसाने अनेक भागांत जमिनी चिबडल्या आहेत. पाऊस कमी झाल्यानंतर वापसा होताच रब्बीच्या पेरण्याला वेग येण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT