Rabi Season : शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा उंचावल्या

मराठवाड्यात उपयुक्त पाणीसाठा ८४ टक्क्यांवर
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

औरंगाबाद : अपेक्षेच्या पुढे जाऊन झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील ८५७ प्रकल्पात ८४.८२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. या पाणीसाठ्यामुळे मराठवाड्यात खरिपाचे (Kharif Crop) अतिवृष्टीने (Wet Drought) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या रब्बी विषयीच्या आशा उंचावल्या आहेत. अर्थात उपलब्ध पाण्याचे वितरण किती कार्यक्षमपणे होते

Rabi Season
Kharif Sowing: खरिपात सात लाख हेक्टरवर पेरा

यावर मराठवाड्यातील सर्व प्रकल्पावरून होणाऱ्या सिंचनाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी व मानार प्रकल्प तुडुंब असून जायकवाडी सिद्धेश्वर, निम्न तेरणा, पैनगंगा, तुडुंब होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. दुसरीकडे माजलगाव, विष्णुपुरी प्रकल्पात जवळपास ८९ टक्के तर

Rabi Season
Soybean : कणेरी कृषी विज्ञान केंद्रातर्फे १२५ एकरांवर सोयाबीन प्रात्यक्षिके

सर्वांत कमी मांजरा प्रकल्पात ५४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मोठ्या प्रकल्पात ९३ टक्के, मध्यम प्रकल्पात ८० टक्के, लघू प्रकल्पात ६९ टक्के, गोदावरी नदीवरील बंधाऱ्यात ५२ टक्के तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील बंधाऱ्यात सरासरी ७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. अतिवृष्टी सततचा पाऊस कीड रोगांच्या आक्रमणामुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील तमाम

Rabi Season
Soybean Rate : देशात खरचं सोयाबीनचं उत्पादन वाढणार का? | Agrowon

शेतकऱ्यांच्या नजरा साठलेल्या पाण्यातून अपेक्षित सिंचन होण्याकडे लागल्या आहेत.सात जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस मराठवाड्यात वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ६७९.५ मिलिमीटर इतकी आहे. वार्षिक सरासरीनुसार २३ सप्टेंबर अखेरपर्यंत ६४०.८ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात सरासरीच्या ११६.५६ टक्के म्हणजे ७४६.९ मिलिमीटर इतका पाऊस झाला. परभणीचा अपवाद वगळता

सर्वच जिल्ह्यात सरासरीच्या पुढे जाऊन पाऊस झाला. ४५० पैकी २६३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यापैकी १३१ मंडळात एक वेळा, ६३ मंडळात दोन वेळा, ३८ मंडळात तीन वेळा, १६ मंडळात चार वेळा, तीन मंडळात पाच वेळा तर सहा मंडळात सहा वेळा अतिवृष्टी झाली.

गोंदी शिवारात टेल एंड ला पाणीच येत नाही. १५ वर्ष झाले जायकवाडीच्या डाव्या मुख्य कॅनॉलची व चाऱ्याची दयनीय अवस्था झाली आहे. दुरुस्ती व प्रशासनाच्या आस्थेपायी अपेक्षित सिंचनच होत नाही.

- गणेश सोळुंके, शेतकरी, गोंदी

वितरण

व्यवस्था खिळखिळी...

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पासह ७५ मध्यम, ७३४ लघू प्रकल्पांमध्ये, गोदावरी नदीवरील १३ बंधारे व तेरणा-मांजरा-रेना नदीवरील २४ बंधारे मिळून ८५७ प्रकल्प आहेत. या धरणांवर किमान ११ लाख ७० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु उपलब्ध पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठीची वितरण व्यवस्था खिळखिळी असल्याने प्रत्यक्षात अपेक्षित सिंचन होतच नाही.

अनेक धरण गळकी आहेत. ३,०४८ कोल्हापुरी बंधाऱ्यावरील ३७६०१ गेट बंधाऱ्यावर नाहीत. धरण व कालव्यातील साचलेला गाळ, झाडेझुडपे, अनेक वर्षापासून कालवे दुरुस्त न केल्यामुळे धरणात पाणी असून देखील देखभाल दुरुस्ती निधी अभावी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत यंदा तरी अपेक्षित पाणी पोहोचेल का हा प्रश्न आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com