Rabi Sowing agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : रब्बीची २ लाख ३५ हजार हेक्टरवर पेरणी

परभणी जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत ज्वारी, गहू, मका या तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ पैकी ६६ हजार ७१६ हेक्टरवर (४२.६६ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीचा पेरा अधिक आहे.

Team Agrowon

परभणी ः यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात (Rabi Season) शुक्रवार (ता. १८) पर्यंत परभणी जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७९४ पैकी १ लाख ६१ हजार ७९७ हेक्टर (५९.८ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात १लाख ७६ हजार ८९१ पैकी ७३ हजार ९२३ हेक्टरवर (४१.८ टक्के) अशी या दोन जिल्ह्यांत मिळून एकूण २ लाख ३५ हजार ७२० हेक्टरवर पेरणी (Rabi Sowing) झाली आहे. यंदाही शेतकऱ्यांची हरभऱ्याला (Chana Cultivation) पसंती आहे. दोन जिल्ह्यांतील अनेक शेतकरी यंदा राजमा (Rajma Cultivation) या पीकाकडे वळले आहेत. त्यामुळे यंदा राजम्याचे क्षेत्र (Rajma Acreage) वाढणार आहे.

परभणी जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत ज्वारी, गहू, मका या तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ पैकी ६६ हजार ७१६ हेक्टरवर (४२.६६ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीचा पेरा अधिक आहे. कडधान्यांची १ लाख १२ हजार २७२ पैकी ९४ हजार ९४८ हेक्टरवर (८४.५७ टक्के) पेरणी झाली. त्यात हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० पैकी ९४ हजार ९३९ हेक्टर, (८४.६४ टक्के) पेरणी आहे करडई, जवस, तीळ, गळित धान्यांची ३ हजार ६४४ पैकी ७७७ हेक्टरवर (२१.३२ टक्के) पेरणी झाली.

त्यात करडईची ३ हजार ३७१ पैकी ७५५ हेक्टर (२२.३९ टक्के) पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात तृणधान्यांची ५५ हजार ६७९ पैकी ७ हजार ९७३ हेक्टर (१४.३२ टक्के) त्यात ज्वारीचे क्षेत्र कडधान्यांची १ लाख २० हजार ३६९ पैकी ६५ हजार ६६८ हेक्टरवर (५४.५६ टक्के) पेरणी झाली. त्यात हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी ६५ हजार ६६८ हेक्टर (५४.६६ टक्के) पेरणी झाली. गळीत धान्यांची ८४२ पैकी २८२ हेक्टर (३३.४५ टक्के) पेरणी झाली.

राजमाचे क्षेत्र वाढणार...

गतवर्षीच्या रब्बी हंगामात या दोन जिल्ह्यांतील नवीन असलेल्या राजमा या पिकांची लागवड केली होती. अनेक शेतकरी राजमा लागवडीकडे वळल्यामुळे यंदा या दोन जिल्ह्यातील राजम्याचे क्षेत्र वाढणार आहे. कृषी विभागाने राजमा लागवडी क्षेत्राची नोंद घेणे आवश्यक आहे.

तालुकानिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ५७९०० ४१८०४ ७२.२

जिंतूर ५३७३० ४३४०५ ८०.८०

सेलू ३३५६१ २३४३७ ६९.८०

मानवत १६११९ ३८४० २३.८०

पाथरी १७०७२ ४५०८ २६.४०

सोनपेठ १५६९८ ८६५३ ५५.१०

गंगाखेड ३२०८६ २०८५२ ६५.००

पालम २०१३० ११७९७ ५८.६०

पूर्णा २४४९५ ३५०० १४.३०

हिंगोली ३१०७४ २९००१ ९३.३०

कळमनुरी ५०१४६ ७७५५ ३३.१३

वसमत ४२०१९ ००० ०००

औंढा नागनाथ २५७२६ २०५५० ७९.९०

सेनगाव २७९२४ १६६१७ ५९.५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT