Rabi Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Jowar Sowing : अठरा हजार हेक्टरवर जतमध्ये ज्वारीची पेरणी

जत तालुक्यात रब्बी हंगामातील आगाप ज्वारीची पेरणी करण्यासाठी शेतकरी पुढे येतात. यंदाही तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीची आगाप पेरणी केली आहे.

टीम ॲग्रोवन

सांगली ः जत तालुक्यात रब्बी हंगामातील (Rabi Season) आगाप ज्वारीची पेरणी (Jowar Sowing) करण्यासाठी शेतकरी पुढे येतात. यंदाही तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीची आगाप पेरणी (Rabi Jowar Sowing) केली आहे. आतापर्यंत तालुक्यात ज्वारीचा १८ हजार ९६७ हेक्टरवर पेरा झाला असून मका पिकाची (Maize Crop) १ हजार २९४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. रब्बी ज्वारी (Rabi Jowar) पेरणीसाठी कृषी विभागाने (Agriculture Department) ६५ टन बियाण्यांचे वाटप केले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जत तालुक्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र ६३ हजार ९१९ हेक्टर आहे. तालुक्यात दरवर्षी ज्वारीची आगाप पेरणी केली जाते. यंदा गेल्या महिन्यात तालुक्यात पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मशागती पूर्ण करून पेरणीचे नियोजन केले होते. त्यानुसार पेरणीदेखील सुरू केली.

कृषी विभागाने तालुक्यात शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील ज्वारीचे बियाणे देण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आतापर्यंत तालुक्यात ६५ टन ज्वारीचे बियाणे शेतकऱ्यांना बांधावर वाटप केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या बियण्यांचा वापर करत पेरणी केली आहे. तालुक्यातील शेगाव मंडलात ३०११, माडग्याळ मंडलात ७९४४ तर उमदी मंडलात ६६७९ हेक्टरवर पेरा झाला आहे. सर्वाधिक ज्वारीची पेरणी माडग्याळ मंडलात झाली आहे.

ज्वारीबरोबरच शेतकरी मका पेरणीसाठीदेखील पुढे असतात. तालुक्यात आतापर्यंत १ हजार २९४ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. ज्वारी आणि मका पेरणीसाठीची तयारी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. येत्या काही दिवसांत ज्वारीची पूर्ण क्षेत्रावर पेरणी होईल. त्याचपाठोपाठ मका पेरणीसाठीही शेतकरी पुढे येतील.

करडई, गहू, हरभरा सूर्यफुल आदी पिकांच्या पेरणीचे पुढच्या पंधरा दिवसांत शेतकरी नियोजन करणार असल्याचे चित्र आहे. जत तालुक्यात उसाचे सरासरी क्षेत्र ७ हजार ४८६ हेक्टर आहे. आजअखेर ३१ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे.

जत तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरणीस गती आली आहे. कृषी विभागाने ६५ टन ज्वारीच्या बियाण्यांचे वाटप केले आहे. तालुक्यात ज्वारीची पेरा लवकरच पूर्ण होईल.
मनोजकुमार वेताळ, उपविभागीय कृषी अधिकारी जत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT