Rabi Jowar : रब्बी ज्वारीच्या घटत्या क्षेत्रावर चिंता

रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या ७२ व्या बैठकीत मराठवाड्यातील रब्बी हंगामात येणाऱ्या समस्यांवर चिंतन करण्यात आले.
Rabi Jowar
Rabi JowarAgrowon
Published on
Updated on

औरंगाबाद : रब्बी हंगामाच्या (Rabi Season) पार्श्वभूमीवर विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या ७२ व्या बैठकीत मराठवाड्यातील रब्बी हंगामात येणाऱ्या समस्यांवर (Rabi Season Issue) चिंतन करण्यात आले. रब्बी ज्वारीच्या (Rabi Jowar) मराठवाड्यातील क्षेत्रावर बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांनी ऑनलाइन हजेरी लावली.

दोन्ही हंगाम पूर्व विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठकीला विशेष महत्त्व आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान ऑनलाइन पद्धतीने कुलगुरू डॉ. इंद्र मणीयांनी स्वीकारले.

Rabi Jowar
Rabi Jowar : रब्बी ज्वारीच्या भरघोस उत्पादनासाठी कोणते वाण निवडाल ?

तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक आर. बी. भागडे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, औरंगाबादचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव, लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे डॉ. पाटील, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत पवार आदी प्रत्यक्ष उपस्थित होते.

Rabi Jowar
Rabi Onion : रब्बी कांद्याच्या रोपवाटिकेचे व्यवस्थापन

औरंगाबादचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. जाधव, लातूरचे डॉ. पाटील यांनी खरीप व रब्बीतील समस्यांचा उहापोह करणारे सादरीकरण केले.

या समस्यांवर चिंतन

वनामकृवीचे संशोधित बियाणे यावे चॅनलमध्ये

फळगळीत सूचविलेल्या उपायांमुळे होत नाही समाधान

नवीन वाणाचा अपेक्षित अस्वीकार वाढवतो चिंता

हवामानातील बदल खरिपाची उशिराची पेरणी आव्हान

प्रात्यक्षिकासाठीच्या बियाणे उपलब्धतेचा प्रश्न

हरभरा पिकावर मर व तांभेराचा प्रादुर्भाव

हळद शिजविण्याच्या तंत्रात हवे सुधारित संशोधन

तूर पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव वाढवतोय चिंता

शेतकरी केंद्रबिंदू मानून विद्यापीठ मार्गक्रमण करते आहे. शेतीला उद्योगाची जोड देण्यासाठी प्रयत्न होतो आहे. औरंगाबाद विद्यापीठाचे उपकेंद्र करण्याच्या दृष्टीने आखणी केली जात असून विद्यापीठाचे उत्पन्न वाढवीण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. इंद्र मणी, कुलगुरू वनामकृवी परभणी.
कृषी विद्यापीठांमध्ये नेमकी काय संशोधन व विस्तार कार्य सुरू आहे. याविषयी चारही विद्यापीठांना सादरीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोयाबीन प्रमाणेच इतरही पर्याय पिकांचा शोध घेण्याची गरज आहे.
आर. बी. भागडे, महासंचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com