Rabi Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : पुणे विभागात रब्बीच्या सरासरी ५५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

थंडी कमीअधिक होत असली तरी रब्बीच्या पेरण्या वेगात सुरू आहेत. पुणे विभागात आतापर्यंत सरासरीच्या ११ लाख ४९ हजार २६६ हेक्टरपैकी सहा लाख २८ हजार ६७० हेक्टर म्हणजेच सरासरी ५५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे ः थंडी कमीअधिक होत असली तरी रब्बीच्या पेरण्या (Rabi Sowing) वेगात सुरू आहेत. पुणे विभागात आतापर्यंत सरासरीच्या ११ लाख ४९ हजार २६६ हेक्टरपैकी सहा लाख २८ हजार ६७० हेक्टर म्हणजेच सरासरी ५५ टक्के पेरण्या (Sowing) पूर्ण झाल्या आहेत. लवकर पेरण्या झालेल्या ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी पिके खुरपणीच्या अवस्थेत असल्याचे कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्रांनी सांगितले.

यंदा १५ ऑक्टोबरच्या दरम्यान परतीच्या पावसाचा जोर ओसरल्यानंतर रब्बी हंगामातील पेरण्यांची सुरुवात झाली आहे. विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत ज्वारी, तीळ, जवस या पिकांच्या पेरण्या काही प्रमाणात झाल्या असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. सध्या नगर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील बाजरी पिकाची काढणी सुरू असून ९७ टक्के काढणी पूर्ण झाली आहे.

सोयाबीन पिकाची काढणी सुरू असून ९८ टक्के क्षेत्रावरील पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. मका पिकाची ९७ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. कापूस पिकाची ४० टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, मका व हरभरा पेरण्या सुरू झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील भात पिकाची काढणी अंतिम टप्यात आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक उगवण व पेरणी सुरू आहे. गहू पिकाची पेरणी सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग, सूर्यफूल पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. तूर पीक फुलोरा व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, मका, हरभरा व सूर्यफूल पिकांच्या पेरणीस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साठून राहिल्याने रब्बी हंगामातील पेरणीत खंड निर्माण झालेला होता. सद्यःस्थितीत पेरणीची कामे प्रगतिपथावर आहे. रब्बी ज्वारी, हरभरा व मका पीक रोप अवस्थेत आहे.

जिल्हानिहाय सरासरी क्षेत्र,

पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये

जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणीचे क्षेत्र टक्केवारी

नगर ४,५८,६३६ २,२०,५४६ ४८

पुणे २,२९,७२२ ९०,४९१ ३९

नगर ४,६०,९१८ ३,१७,६३४ ६९

एकूण ११,४९,२६६ ६,२८,६७० ५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT