Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain : सिंधुदुर्गच्या काही भागांना परतीच्या पावसाचा तडाखा

गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पाऊस सुरू असून भातपिकाची कापणी रखडली आहे. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागाला गुरुवारी (ता. २०) सायकांळी उशिरा विजांच्या कडकडाटासह पडलेल्या परतीच्या जोरदार (Heavy Rain With Lightning) पावसाचा तडाखा (Rain Update Sindhudurg) बसला. या पावसामुळे भातपीक कापणी (Paddy Harvesting) केलेल्या शेतकऱ्यांची आवराआवर करताना तारांबळ उडाली. शुक्रवारी (ता. २१) सकाळपासून पावसाने उघडीप दिली.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पाऊस सुरू असून भातपिकाची कापणी रखडली आहे. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. परंतु, सायकांळी उशिरापर्यंत पाऊस पडला नाही; मात्र सायकांळी उशिरा कणकवली तालुक्यात विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाला सुरुवात झाली.

या तालुक्याच्या अनेक भागांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यानंतर रात्री वैभववाडी, सावंतवाडी, कुडाळ या तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. या पावसामुळे भातपिकाची कापणी केलेल्या शेतकऱ्यांची आवराआवर करताना दमछाक झाली. दरम्यान रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी पडत होत्या. शुक्रवारी (ता. २१) सकाळपासून पावसाने उघडीप दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आठ ठराव रद्द

Cattle Feed Shortage : अहिल्यानगर जिल्ह्यात चार महिने पुरेल एवढाच चारा उपलब्ध

Yavatmal Drought : अन्यथा नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही

Cotton Pink Bollworm: गुलाबी बोंड अळीचा कापसावर वाढता धोका

Loan Waiver Scheme : कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत ४० हजार शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT