Silk Farming Agrowon
ताज्या बातम्या

Silk Farming : रेशीम शेतीमुळे उत्पन्नात शाश्वतता आली

रेशीम शेतीमुळे उत्पन्नात शाश्वतता आली,’’ अशी प्रतिक्रिया कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी आयोजित रेशीम शेतीदिन कार्यक्रमात शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

टीम ॲग्रोवन

जालना : ‘‘रेशीम शेतीमुळे (Silk farming) उत्पन्नात शाश्वतता (Sustainable Income) आली,’’ अशी प्रतिक्रिया कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी आयोजित रेशीम शेतीदिन (Silk Agriculture Day) कार्यक्रमात शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना व रेशीम उत्पादक गट, कचरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रेशीम शेती दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी.एस.नेहरकर, वनामकृवि, परभणी येथील रेशीम संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. चंद्रकांत लटपटे,

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस.व्ही.सोनुने, कृषी विज्ञान केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी, उद्यानविद्या तज्ज्ञ प्रा.सुनील कळम, कृषी अभियंता प्रा.पंडित वासरे, कृषी विभाग जालनाचे निवृत्त कृषी अधिकारी नंदकिशोर पुंड, सहयोगी संशोधन अनिल म्हात्रे, कृषी सहाय्यक विनोद ढोबळे, कचरेवाडी येथील उपसरपंच बाबासाहेब कचरे हे उपस्थित होते.

रेशीम शेती मध्ये स्वयंरोजगाराची मोठी क्षमता आहे. रेशीम शेतीमधील शाश्वतता टिकवायची असेल तर तुती पाल्याच्या चांगल्या उत्पादनासाठी तुती बागेत रासायनिक खतासोबत शेणखत, जैविक खताचा वापर करा. रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये रेशीम कीटकांच्या वाढीसाठी योग्य तापमान व आर्द्रता ठेवणे गरजेचे आहे.

तुतीची लागवड पध्दत, रेशीम कीटक संगोपन व कीटक संगोपन गृहात त्यांचे निर्जंतुकीकरण, कोष काढणी व कोषापासून तयार होणाऱ्या विविध वस्तू व रेशीम शेती मधील यांत्रिकीकरण याबद्दल डॉ. लटपटे यांनी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सोनुने यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी रेशीम उत्पादक शेतकरी हरिभाऊ ठोकळ, संतोष कचरे यांनी रेशीम शेती संदर्भात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजय मिटकरी यांनी केले तर आभार प्रा. पंडित वासरे यांनी मानले. कार्यक्रमास कचरेवाडी, वानडगाव, खनेपुरी, पाचन वडगाव, लोणार बाहेगाव, माळी पिंपळगाव, खरपुडी, गुरु पिंपरी, रांजणी आणि अकोला (नि.) येथून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT