Animal Feed
Animal Feed Agrowon
ताज्या बातम्या

Animal Feed : पशुखाद्याचे दर कमी होण्याचे संकेत

टीम ॲग्रोवन

पुणे ः केंद्र सरकारने दाल मिल आणि पशुखाद्य उद्योगांना (Animal Feed Industry) दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कडधान्य प्रक्रिया (Pulses Processing) करताना निघणारे टरफल आणि चुऱ्यावरील ५ टक्के जीएसटी सरकारने काढला. यामुळे पशुखाद्याचेही दर (Animal Feed Rate) कमी होण्यास मदत होऊ शकते, असे प्रक्रिया उद्योगाने सांगितले.

देशात दालमिल उद्योगाचा पसारा मोठ्या प्रमाणात वाढला. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये दाल मिल उद्योगाचा विस्तार मोठा आहे. देशात सध्या ८ हजारांपेक्षा अधिक दाल मिल उद्योग कार्यरत आहेत. मात्र ३ ऑगस्ट २०२२ रोजी केंद्र सरकारने दाल मिल उद्योगाला जीएसटीच्या विस्तारित कक्षेत आणले.

सरकारने कडधान्याचे टरफल आणि चुरा यावर ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दाल मिल उद्योग आणि पशुखाद्य निर्मिती उद्योग अडचणीत आले होते. कडधान्यावर प्रक्रिया करताना त्यापासून चरफल आणि चुरा निघतो. त्याचा वापर पशुखाद्य निर्मितीसाठी केला जातो.

दाल मिल उद्योगाने सरकारच्या या निर्णयाला विरोध केला. दाल मिल उद्योग कमी नफ्यावर काम करतो, असे ऑल इंडिया दाल मिल असोसिएशन सांगत होते. तर बाजारातील चढ-उताराचा फटका उद्योगाला सतत बसत असतो. त्यातच सरकारने कडधान्याचे टरफल आणि चुरा यावर जीएसटी लावल्याने अडचणी वाढल्या. त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी उद्योगांनी लावून धरली होती.

ऑल इंडिया दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अगरवाल म्हणाले, ‘‘असोसिएशनने अनेक वेळा सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला होता. नुकतेच दाल मिल उद्योग आणि सरकारच्या मंत्र्यांमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत उद्योगाच्या प्रतिनिधींनी जीएसटीमुळे येणाऱ्या अडचणी मांडल्या होत्या.’’

‘एसटी काउंसिल’चा निर्णय

नुकत्याच पार पडलेल्या ४८ व्या जीएसटी काउंसिलच्या बैठकीत कडधान्य टरफल आणि चुऱ्यावरील ५ टक्के जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा देशातील दालमिल आणि पशुखाद्य निर्मिती उद्योगांनाही दिलासा मिळणार आहे.

पशुपालकांना दिलासा

‘‘प्रक्रियेवरील ५ टक्के कर कमी झाल्याने पशुखाद्याचे दर कमी होऊ शकतात. याचा फायदा पशुपालकांनाही मिळू शकतो. पशुखाद्याच्या दरात मागील दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच काही भागांमध्ये पशुखाद्याचा तुटवडाही जाणवत होता. मात्र कच्च्या मालावरील ५ टक्के जीएसटी कमी झाल्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळणार आहे,’’ असे ऑल इंडिया दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अगरवाल यांनी सांगितले.

आम्ही कडधान्याचे टरफल आणि चुऱ्यावरील जीएसटी रद्द व्हावा, यासाठी सतत पाठपुरावा केला होता. पंतप्रधान, अर्थमंत्र्यांसह जीएसटी काउंसिलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून उद्योगांना येणाऱ्या अडचणी मांडल्या होत्या. त्याला आता यश आले आहे.

- सुरेश आगरवाल, अध्यक्ष, ऑल इंडिया दाल मिल असोसिएशन.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT