Feed Blocks : जनावरांसाठी खाद्य ठोकळे बनविण्यासाठी यंत्र

जुनागढ (गुजरात) कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी विभागाने जनावरांसाठी खाद्याचे ठोकळे म्हणजेच फीड ब्लॉक बनविण्याचे यंत्र विकसित केले आहे.
Feed Blocks
Feed BlocksAgrowon

पिकाच्या काढणीनंतर उरलेले अवशेष शक्यतो वाया जातात. भाताचे तूस, भुईमूगाचा पाला, गव्हाचा भूसा उपयोग होत नसल्यामुळे जाळून टाकला जातो. पिकाच्या उरलेल्या अवशेषाचा वापर जर जनावरांसाठी चारा म्हणून केला तर हे घटक वाया न जाता जनावरांसाठी चाराटंचाईच्या काळात चारा म्हणून उपयोगी पडतील.

Feed Blocks
Poultry Feed : कोंबड्यांना बुरशीयुक्त खाद्य देताय?

हा विचार करुन जुनागढ (गुजरात) कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी विभागाने जनावरांसाठी खाद्याचे ठोकळे म्हणजेच फीड ब्लॉक बनविण्याचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राचा वापर करून गव्हाचा भुसा, भुईमुगाचा पाला किंवा पेंड, उसाची मळी, मीठ व युरियाचा वापर करून ५ किलोचे खाद्याचे ठोकळे बनविता येतात.

Feed Blocks
Poultry Feed : बुरशीजन्य खाद्यामुळे कोंबड्यांवर काय परिणाम होतात?

यंत्राची वैशिष्ट्ये ः

- हे यंत्र हस्तचलित असून, एक अश्वशक्तीच्या मोटारीवर चालते.

- हे यंत्र एका मजुराकडून चालविता येते.

- प्रतितासाला ४ ते ५, तर एका दिवसाला ४० असे पाच किलोचे खाद्याचे ठोकळे या यंत्राद्वारे बनविता येतात.

- या यंत्रामुळे निकृष्ट चारा उपयोगात आणता येतो.

- हे खाद्य ठोकळे जनावरे आवडीने खातात.

- या यंत्रामुळे चाऱ्याची साठवणक्षमता वाढते. सोबतच चाऱ्याची ने-आण करणेही सोपे जाते.

- कमी वेळात काम होत असल्यामुळे मजुरीवरील खर्च कमी होतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com