Gokul Milk Agrowon
ताज्या बातम्या

Shoumika Mahadik : गोकुळच्या दूध पॅकिंग एजन्सीवरून घराणेशाही निघाली, शौमिका महाडिकांची खरमरीत टीका

Gokul Milk : गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी जिल्हा दूध संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Zilha Dudh Sangh : गोकुळच्या घटलेल्या संकलन आणि विक्रीवर काल चिंता व्यक्त करणारे गोकुळचे नेते आज संघ कसा फायद्यात आहे हे पटवून देत आहेत, हेच मुळात हास्यास्पद आहे. सत्तांतराला दोन वर्षे झाली तरीही महाडिकांचे टँकर आणि जावयाचा ठेका याच्या पलीकडे विचार न करणाऱ्या आणि अजूनही वैयक्तिक आरोपांमध्ये धन्यता मानणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असे पत्रक काढत गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी जिल्हा दूध संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांच्यावर खरमरित टीका केली आहे.

महाडिक पुढे म्हणाल्या की, गोकुळच्या अध्यक्षांना वेठीस धरून 'जबरदस्तीने' त्याच्या सहीचे पत्रक सतेज पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे. आपण केलेले आरोप पुराव्यानिशी सिद्ध करण्याची आव्हान मी देत आहे. त्यासाठी सतेज पाटील यांनी कधीही एका व्यासपीठावर समोरासमोर यावे. त्यांनी आपले आव्हान स्वीकारावे.

मुळात कोणाच्या जावयांच्या ठेक्याचा पत्रकार परिषदेत आपला मुद्दाच नव्हता. तरीही सवयीप्रमाणे जाणूनबुजून पै-पाहुण्यांवर घसरायचंच असेल तर संजय डी. पाटील यांच्या पाहुण्याला कोणता ठेका दिला? विद्यमान अध्यक्ष, संचालक यांच्या पै-पाहुण्यांकडे किती ठेके आहेत व किती नोकरीला लावले?

राधानगरी वाहतूक संघ किंवा शेतकरी संघाच्या नावाखाली कोणाच्या किती गाड्या गोकुळला लावल्या? पॅकिंग किंवा वितरण व्यवस्था बदलताना कोणी किती टक्केवारी ठरवून दिली ? यावर आपणही बोलू शकतो, पण वैयक्तिक टीका न करता गोकुळ कसा टिकेल यावर आजही आपला भर आहे, असेही पत्रकात नमूद केले आहे.

काय म्हणाले होते अरूण डोंगळे

'गोकुळ'चे संकलन व मुंबईतील विक्री घटल्याचा आरोप शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी केला होता. यावर आता गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे यांनी पलटवार केला आहे. पुणे येथील गायत्री कोल्ड स्टोरेज दूध पॅकिंग एजन्सी ही महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांचे जावई विजय ढेरे यांची आहे.

दरम्यान पुण्यातील ढेरे यांचा ठेका रद्द करत आम्ही किकवी येथील अनंत डेअरी यांना दूध पॅकिंग कंपनीला ठेका दिल्यामुळे संघाचे जवळपास वार्षिक चार कोटी रुपये बचत होत आहे. केवळ जावयाचा दूध पॅकिंगचा ठेका रद्द झाला आणि महाडिकांचे दूध संघातील ४५ टँकर बंद करण्यात आल्याने होणारा आर्थिक फायदा थांबल्यानेच शौमिका महाडिक गोकुळवर आरोप करत असल्याची जोरदार टीका अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT