Gokul Milk : महादेवराव महाडिकांचे टँकर बंद केल्याने गोकुळवर आरोप, अरूण डोंगळेंचा पलटवार

Gokul Milk Chairman : आर्थिक फायदा थांबल्यानेच शौमिका महाडिक गोकुळवर आरोप करत असल्याची जोरदार टीका अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केली.
Gokul Milk Kolhapur
Gokul Milk Kolhapuragrowon

Gokul Milk Kolhapur : 'गोकुळ'चे संकलन व मुंबईतील विक्री घटल्याचा आरोप शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी केला होता. यावर आता गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे यांनी पलटवार केला आहे. पुणे येथील गायत्री कोल्ड स्टोरेज दूध पॅकिंग एजन्सी ही महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांचे जावई विजय ढेरे यांची आहे.

दरम्यान पुण्यातील ढेरे यांचा ठेका रद्द करत आम्ही किकवी येथील अनंत डेअरी यांना दूध पॅकिंग कंपनीला ठेका दिल्यामुळे संघाचे जवळपास वार्षिक चार कोटी रुपये बचत होत आहे. केवळ जावयाचा दूध पॅकिंगचा ठेका रद्द झाला आणि महाडिकांचे दूध संघातील ४५ टँकर बंद करण्यात आल्याने होणारा आर्थिक फायदा थांबल्यानेच शौमिका महाडिक गोकुळवर आरोप करत असल्याची जोरदार टीका अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केली.

डोंगळे पुढे म्हणाले की, गोकुळच्या दूध (Gokul Milk Kolhapur) संकलनामध्ये घट झालेली नसून मागच्यावर्षीच्या तुलनेत प्रतिदिन ५० हजार लिटर वाढ झालीय. मुंबईतील दूध विक्रीमध्ये गतवर्षाच्या तुलनेत वार्षिक ६९ लाख लिटरची वाढ झालेली आहे. पशुखाद्य विक्रीमध्ये वर्षाला १४ टक्के इतकी वाढ झाली. परंतु गोकुळची खरी परिस्थिती माहिती असुनही चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न शौमिका महाडिक करत आहेत. या गोष्टी त्यांनी थांबवाव्यात.

पुणे येथे वाढत्या रहदारीचा विचार करता कोल्हापुरातून जाणाऱ्या दुधाच्या गाड्यांना मांजरी प्लांटपर्यंत पोहोचण्यास वेळ होत असल्याने वितरकांना वेळेत दूध मिळत नव्हते म्हणून गोकुळने संघाच्या सोयीच्या दृष्टीने जागा न मिळाल्यामुळे किकवी येथील अनंत प्लॅटला नियमानुसार दूध पॅकिंगचा ठेका दिला.

गायत्री कोल्ड स्टोरेज येथे प्रोसेसिंग सुविधा नसल्यामुळे दररोज मशीनद्वारे निघणारे लिकेज, डिस्टुबिशेन लिकेज आदी दुधाची विल्हेवाट ज्या त्यावेळी होण्यासाठी कात्रज डेअरीकडे सध्याचे दूध प्रोसेसिंगसाठी नाममात्र दराने विक्री करायला लागत होते. आता त्वरित प्रोसेसिंग होत बचत होत असल्याचीही माहिती डोंगळे यांनी दिली.

पशुखाद्याच्या विक्रीत १४ टक्क्यांनी वाढ

गोकुळ दूध संघामध्ये सत्तांतर झाल्यानंतर या दोन ते अडीच वर्षात प्राथमिक दूध संस्थाकडून पशुखाद्य मागणीत १४ टक्क्यांनी वाढ झाल्याचीही माहिती अध्यक्ष डोंगळे यांनी दिली.

अशी झाली वाहतूक खर्चात बचत

गोकुळ ते गायत्री : १.२२ रुपये

गोकुळ ते किकवी : १.०७ रुपये

गोकुळची बचत : ९५ पैसे प्र. लि.

प्रतिदिन बचत - 60 हजार रूपये

प्रतिमहिना बचत : १८ लाख रुपये

प्रतिलिटर पॅकिंग खर्चात अशी झाली बचत

गायत्री कोल्ड स्टोरेज : १ रुपये २७ पैसे

गोकुळ ते किकवी : १ रुपये २० पैसे

गोकुळची बचत : ७ पैसे प्रतिलिटर

प्रतिदिन बचत : २८ हजार रुपये

प्रति महिना बचत : ८ लाख ४० हजार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com