Green Fodder  Agrowon
ताज्या बातम्या

Fodder Shortage : हिरव्या चाऱ्याची टंचाई

Green Fodder : जिल्ह्यातील वैरण बाजारामध्ये हिरव्या चाऱ्याची आवक ४० टक्क्यांवर आली असून दरातही ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील वैरण बाजारामध्ये हिरव्या चाऱ्याची आवक ४० टक्क्यांवर आली असून दरातही ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसाचे आगमन लांबल्यास पशुपालकांसह जनावरांच्या भुकेची व्याकुळता अधिक वाढणार आहे.

यावर्षीचा उन्हाळा सर्वांनाच असह्य करणारा ठरला आहे. त्यात मॉन्सून लांबला असून उन्हाचा तडाका काही कमी होताना दिसत नाही. अशातच नद्यांचे पात्र कोरडे झाले असताना चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नदीकाठची गवताचे दड्ड, कुरणे पाण्याविना करपू लागली आहेत. त्यामुळे वैरण बाजारात चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. दररोज होणारी बैलगाड्यांची आवक कमालीची घटली आहे.

गवताच्या बरोबरीला शाळूची जेमतेम आवक होऊ लागली आहे. पुरवठा कमी होत असल्याने दराची तीव्र झळही पशुपालकांना सहन करावी लागत आहे. चारा विक्रेत्यांनी गवत, शाळू पेंढीच्या दरात सरासरी ५ ते १० टक्क्यांनी वाढ केल्याचे पाहायला मिळते.

पाण्याच्या कमतरतेमुळे चाऱ्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. उपसा बंदी केली जात असून सुरुवातीला ऊस व अन्य पिकांना पाणी दिले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा योजनेतून पाणी घेतले असले तरी चाऱ्याला पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. आधीच उन्हाळ्याच्या दिवसात दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण खालावते. चारा टंचाईमुळे आता दुधासह जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे.

जीकी मावाचा रोगाचा प्रादुर्भाव

गवताला पाणी कमी पडले आणि उन्हाच्या तडाका वाढला की रोगाला बळी पडावे लागते. यंदा हाच जीकी मावा रोगाचा प्रादुर्भाव गवतावर प्रचंड वाढला आहे. सर्रास गवतावर हा पांढऱ्या रंगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झपाटला आहे.

चाऱ्याची टंचाई आणि त्यात रोगाला बळी पडलेला चारा यामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे पशुपालक व चारा विक्रेत्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT